प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७ 🌹 चले जाव आंदोलन 🌹 याप्रमाणे बघता बघता १९४५ साल संपले व १९४६ साल उजाडले. यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता. 'चले जाव' आंदोलन सुरूच होते. त्यातच हैद्राबादमध्ये रझाकारांनी अनन्वित अत्याचार सुरू केल्याच्या बातम्या सारख्या कानावर येऊन थडकू लागल्या. संन्यास घेण्यापूर्वी श्रींनी रामदासी संप्रदाय स्वीकारला होता व त्यांच्यावर श्रीसमर्थांचा व त्यांच्या वाङमयाचा फार खोल परिणाम झालेला होता. ते संस्कार यावेळी बळावून 'अहो हिंदूंनो, संघ संपन्न - व्हावे.' 'हिंदूंनो डोळे उघडा' 'दूर करी शीघ्र जाच हा' 'श्रीसमर्थ प्रार्थनाष्टक' यासारखी काव्ये निर्माण झाली. यातील काही तत्कालीन 'केसरी' सारख्या वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाली. 🌹 गुरूदर्शनाची ओढ 🌹 याकाळात श्रींचे वास्तव्य जरी मुख्यतः चासकमान येथे होते, तरी मनात जर श्रीगुरूमहाराजांच्या दर्शनाची इच्छा उद्भवली तर पहाटेच कुणालाही न विचारता नित्यक्रम आवरला की चंबू गबाळे उचलून सरळ आळ्याच्या दिशेने चालू लागत. संन्यास घेतल्यापासून पैशाला स...