Posts

Showing posts with the label paranda

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४ 🌹 शाळिग्राम हृदयावर सरकवून घेतला 🌹 नंतरचे दाेन दिवस बाेलणे फारसे नव्हते. स्नान वगैरे सुरूच हाेते, पण समाधी अवस्था असावी. नंतर १० व्या दिवशीही बोलणे बंद हाेते. सकाळ व संध्याकाळचे स्नान स्नानगृहात न हाेता तेथेच परातीत बसवून घातले गेले. सकाळपासून घाेंगडीवर ठेवण्यात आले हाेते. बाेलणे बंद असले तरी फारच वेदना वाढल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घाेष ते करीत असत. असाच सर्व दिवस गेला. रात्री एकच्या सुमारास डाॅ. कुलकर्णी ( त्यांच्या सेवेला रात्रभर हाेतेच. ) यांनी वेळ जवळ आल्याचे जाणले व पूर्वी श्रींनी सांगितल्याप्रमाणे शाळिग्राम त्यांच्या छातीवर ठेवला. वास्तविक श्रींचे हातपाय अगदी गार पडले हाेते. तशा अवस्थेतही श्रींनी आपल्या दाेन हातांनी ताे हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच त्यांना ( गंगाजळ व तुळशीपत्र ) तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा घाेष सुरू असतांनाच ( फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वा. १० मिनिटांनी ) खाडकन् डोळे उघडले गेले. ( एकदम वीज चमकल्यासारखे झाले ) आणि त्याचवेळी प्राण पंचतत्वांत विलीन झाले. अश...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २३

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २३             🌹 महासमाधी 🌹 वज्रादपि कठाेराणि मृदूनि कुसुमादपि । लाेकाेत्तराणां चेतांसि काे हि विज्ञातुमर्हसि ।। असे म्हणतात ना, ते अगदी खरे आहे. दुसर्‍याच्या दुःखाचा विचार मनात आला की, लाेकाेत्तर पुरूषांचे हृदय कुसुमाहून काेमल बनते. पण स्वसुखाविषयी स्वतःच्या, देहसाैख्याविषयी ते प्रसंगी वज्रापेक्षा कठाेर बनते. श्रींच्या संबंधीही असेच म्हणणे योग्य ठरेल.     १९६६ पासून श्रींच्या मनात प्रायोपवेशनाने देहत्याग करण्याचा विचार घाेळत होता. जसे जसे दिवस लाेटू लागले तसा हा विचार बळावतच गेला. परांडा येथेच फाल्गुन वद्यात प्रतिपदेपासून प्रायोपवेशन करून देह ठेवण्याचे ठरविले आहे तरी कुणालाही पाैर्णिमेपर्यंत दर्शनास यावयाचे असेल त्यांनी यावे, याप्रमाणे सर्व शिष्यमंडळींच्याकडे पत्रे रवाना झाली.     पू. श्री. गुळवणी महाराज व पू. श्री. श्रीधरस्वामी महाराज ह्यांनाही पत्राने हा निश्चय कळविला गेला. त्यांची, तसेच इतर अनेक विद्वान मंडळींची पत्रे आली की आपण हे उप...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २२

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २२        🌹 रामवनचा अद्वितीय सत्कार 🌹          सप्टेंबर १० पर्यंत १६ पारायणे पुरी झाली हाेती व शिवपुराण सांगणे संपून अभंग रामायणावर श्रींची प्रवचने सुरू हाेती. ६ - १० पर्यंत २५ पारायणे पुरी झाली. याच सुमारास रामवन ( मध्यप्रदेश, सतना ) येथे श्री प्रज्ञानानंद पेटिका स्थापन हाेऊन त्यात रामचरितमानस ( मराठी ) गूढार्थ चंद्रिका नमुना अंक, प्रस्तावना खंड, मानसमणितील श्रींचे सर्व छापील लेख व श्रींचा पत्रव्यवहार वगैरे पेटिकेत ठेवला गेला.    फाल्गुन अखेर १०० पारायणे पुरी करावयाचा श्रींचा विचार हाेता. म्हणून मार्गशीर्ष पाैर्णिमेपासून ( दत्तजयंती ) १५/१२/१९५९ पासून मानसाची द्विदिन पारायणे सुरू झाली. या सुमारास श्रींनी १९५३ साली जी हस्तलिखित पंचरंगी पाेथी लिहून मानस संघ रामवनला दिली हाेती, ती त्यांच्या जागेत काेणी व्यक्तीने चाेरल्याचे पत्र रामवनहून आले हाेते. श्री रघुनाथांनी कदाचित ही परीक्षा घेतली असेल की श्रींना वाईट वाटते की काय? पण एखादी वस्तू काेणास दिली की तिचे काय झाल...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - २१

Image
प. पू .श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २१ 🌹 मराठवाड्यातील वास्तव्य 🌹      १९५९ साली श्रींचा मुक्काम परंड्यास गेल्यानंतर समाधिकाळापर्यंतचे (१९६८ ) जास्तीत जास्त वास्तव्य मराठवाड्यांतच झाले. एकदाच नाशिक पंचवटी येथे जाणे झाले व त्यावेळी परत परंड्यास जाताना १९६१ साली थाेडे दिवस इस्लामपूरला जाणे झाले होते. तसेच १९६६ साली काही महिने सातारा, चिकुर्डे येथे निवास झाला. गंगाखेड, लाेहारा, उस्मानाबाद, परांडा वगैरे भागातच अधिक काळ निवास झाला.     ४ मार्च १९५९ ला श्री गंगाखेड येथे प्रथम आले. गंगाखेड येथील जहागिरदारांच्या श्रीकृष्ण मंदिरातील सभामंडपाच्या माडीवर स्वतंत्र खाेलीत श्रींचा निवास हाेता. मंदिर श्री गाेदेच्या काठी हाेते. चांगले सुंदर, एकांत, शांत व बंदाेबस्तात असलेले. वरच दिवा, कंदील, बादली, लाेटी व बादलीभर पाणी एवढी व्यवस्था हाेती. फक्त दाेन वेळ स्नानाला व एक वेळ भिक्षेसाठी खाली उतरावे लागे. लाेकांची उपाधी नसल्यासारखीच हाेती. षष्ठीपासून एकादशीपर्यंत मंदिरात मामुली उत्सव असे. त्यावेळी प्रवचने हाेत. नदीवर व भिक्षेस जाण्यास पायर्‍...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २०

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २० 🌹 मानसमणि सहयोग 🌹          त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे १९५० पासूनच श्रींनी 'मानसमणि' या रामवन, सतना, मध्यप्रदेश येथून प्रसिद्ध होणाऱ्या, तुलसीरामायणावरील लेखांना प्राधान्य देणाऱ्या हिंदी मासिकाचे ग्राहकत्व स्वीकारले होते. १९५२ च्या नोव्हेंबर महिन्यात या 'मानसमणि'च्या अंकात 'मानस (काव्य) दोषारोपण विराकरण' हा श्रींचा लेख प्रसिद्ध झाला. तो वाचून इंटर पास होऊन पोस्टात नोकरी करणाऱ्या श्री धनसिंह भदौरिया नावाच्या (कानपूरजवळील परौख, पोस्ट नोचारी, जिल्हा कानपूर) तरुणाचा दर महिन्यास ६/७ शंका, समाधानासाठी श्रींच्याकडे येऊ लागल्या. व त्या टीकालेखनसमाप्तीपर्यंत नियमीतपणे येत होत्या. त्यामुळे सुमारे १५० शंकांचे समाधान श्रींना मानसाधारे करण्यास सापडले व टीकालेखनास फार मदत झाली. आश्चर्यकारक घटना ही की, टीकालेखनसमाप्ती व त्या भैय्या धनसिंह भदौरियाचे देहावसान समकालीच झाले. श्रींचे प्रत्यक्ष दर्शन त्यास अखेरपर्यंत झाले नव्हते. ही अनपेक्षित ईश्वरी योजना अगदी थक्क करणारीच आहे. हा पत्रव्यवहार चाल...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १९

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती   स्वामी चरित्र - भाग १९ 🌹 सांगली-सातारा जिल्ह्यातील वास्तव्य 🌹 आतापर्यंत श्रींनी मानसातील अनेक गूढार्थ लिहून ठेवलेले होते व अशा प्रकारची, मानसातील गूढार्थ प्रगट करणारी टीका 'मानसपीयूष' (अयोध्येहून) प्रसिद्ध झालेली श्रींच्या कानावर आली होती. पण चौकशी करूनही ही टीका मिळू शकली नाही. मात्र १९५० मध्ये 'मानसमणि' ह्या, रामचरितमानसावरील लेखनासच अग्रक्रम देणाऱ्या हिंदी मासिकाचा शोध लागला व त्याचे ग्राहक होण्याचा योग श्रींना आला.        याच वर्षी श्रींनी श्रीरामचरितमानसाची १०८ त्रिदिन पारायणे करण्याचे ठरवून त्याप्रमाणे पारायणास सुरूवात केली. साधारण पहाटे ६ ते ६।। ला वाचनास प्रारंभ होई आणि ११ ते ११।। पर्यंत वाचन पुरे होई. यावेळी प्रवास करावयाचा प्रसंग आलाच तरी त्या दिवशीचे वाचन संपल्यावर निघावे लागे व त्याच दिवशी रात्रीपर्यंत मुक्कामाचे स्थळ गाठावे लागे. या संकल्पाची पूर्ती ३१ आॅगस्ट १९५१ ला झाली.         यावेळी श्री. ना. भा. जोशी ह्यांनी दर्यापूर सोडले होते व ते इस्ल...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १८

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १८ 🌹 बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला 🌹         १९४७  मधील एप्रिल महिना होता. १२ तारीख, म्हणजे कदाचित् रामनवरात्रातील एखादा दिवस असण्याची शक्यता आहे. रोजच्याप्रमाणे श्रींचे प्रातःस्नान वगैरे झाल्यावर ध्यानास बसले असता व श्रींचा धनुर्धारी रूपाचा अभ्यास असताही, त्या दिवशी अचानक बालरूपाचे  दर्शन झाले. श्रीराम, बालरूप, बसलेले, नीलवर्ण, दैदीप्यमान, स्मितहास्य, गालावर खूप लाली, कानात कुंडले, अंगात पिवळे झबले, कपाळावर पिवळा गोरोचन टिळक (उर्ध्व), हृदयावर झबल्यावर मौक्तिक मणिहार, मधून मधून कमरेची रत्नजडित मेखला दिसत होती. याप्रमाणे ता. १२ ला हेच रूप सारखे दृष्टीसमोर येऊ लागले. या रूपाचे वर्णन करणारे काव्य 'बालरूप रामचंद्र पूर्ण उगवला' हे त्याचवेळी तयार झाले. ते १५/४/४७ रोजी वहीत लिहून ठेवलेले आढळले. तसेच ता. १५/४/४७ या दिवशी असेच मनात न आणताही अकल्पित श्री महालक्ष्मी चतुर्भुज, कमलावर पद्मासन घातलेली, सुवर्णसदृशकांती, रक्तवस्त्र परिधान केलेली, वर अभय, खड्ग, शूल धारण केलेली असे दर्शन झाले. या महिन्यात श...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १७ 🌹 चले जाव आंदोलन 🌹 याप्रमाणे बघता बघता १९४५ साल संपले व १९४६ साल उजाडले. यावेळी भारत स्वतंत्र झालेला नव्हता. 'चले जाव' आंदोलन सुरूच होते. त्यातच हैद्राबादमध्ये रझाकारांनी अनन्वित अत्याचार सुरू केल्याच्या बातम्या सारख्या कानावर येऊन थडकू लागल्या. संन्यास घेण्यापूर्वी श्रींनी रामदासी संप्रदाय स्वीकारला होता व त्यांच्यावर श्रीसमर्थांचा व त्यांच्या वाङमयाचा फार खोल परिणाम झालेला होता. ते संस्कार यावेळी बळावून 'अहो हिंदूंनो, संघ संपन्न - व्हावे.' 'हिंदूंनो डोळे उघडा' 'दूर करी शीघ्र जाच हा' 'श्रीसमर्थ प्रार्थनाष्टक' यासारखी काव्ये निर्माण झाली. यातील काही तत्कालीन 'केसरी' सारख्या वृत्तपत्रातून प्रसिद्धही झाली. 🌹 गुरूदर्शनाची ओढ 🌹 याकाळात श्रींचे वास्तव्य जरी मुख्यतः चासकमान येथे होते, तरी मनात जर श्रीगुरूमहाराजांच्या दर्शनाची इच्छा उद्भवली तर पहाटेच कुणालाही न विचारता नित्यक्रम आवरला की चंबू गबाळे उचलून सरळ आळ्याच्या दिशेने चालू लागत. संन्यास घेतल्यापासून पैशाला स...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६ 🌹 गुरूचरणी अनुवादनमानस अर्पण 🌹 लगेचच श्री आळ्याच्या महाराजांना पत्र लिहून याप्रमाणे अनुवाद लिहून झाल्याचे कळविले व दर्शनाविषयी अनुज्ञा मागितली. ता. ६/११/४५ व ७/११/४५ या दोन दिवसांत श्रीरामाची, बाबा गंगादासांची व श्रीरामायणाची वगैरे विविध आरत्या तयार झाल्या व तोपर्यंत श्रींची अनुज्ञा मिळाल्याने श्रीमहाराजांचे दर्शनास श्रींचे जाणे झाले.        श्रींनी श्री आळ्याच्या महाराजांना मराठी रामचरितमानस (हस्तलिखित) वाचून दाखविण्यास सुरूवात केली. ते जसजसे वाचू लागले, तसतसे श्री आळ्याच्या महाराजांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. काही ठिकाणी तर ते अगदी हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडूच लागले. इकडे श्रींचाही वाचताना कंठ भरून येऊन, डोळ्यांतून अश्रुधारा अशी कठीण अवस्था होऊ लागली. शेवटी अशा रीतीने मधूनच थांबत, तो अनुवाद श्रीमहाराजांना अधून मधून वाचून दाखविला व त्यांचा अभिप्राय व आशीर्वाद मागितला. तेव्हा असा असा लिहून आणा म्हणून आज्ञा झाली व त्याप्रमाणे लिहून आल्यावर श्री आळ्याच्या महाराजांनी खाली सही केली. तो अभिप...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १५

Image
प . पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १५      🌹 आमु ची चिंता रघुरायाला 🌹 असो. याप्रमाणे फाल्गुनात (१९४५ मार्च असावा) याप्रमाणे या शिष्यांमुळे श्रींना हे सर्व क्लेश सोसावे लागले. तब्येत जरा सुधारली न सुधारली तोच चैत्रात पुन्हा मुदतीचा ताप आला. यावेळी तर नाडीही लागेना अशी अवस्था एकवेळ आली होती. अर्थात् तरी पूर्ण शुद्धीवर होते व 'रामास आमची सर्व चिंता आहे. तुम्ही काळजी करू नका किंवा कुणाला सेवेसाठीही बोलवू नका. स्वस्थ पडू द्या, फार तर प्यायला पाणी तेवढे द्या,' असे सांगितले.           खरेतर समाधीचीच वेळ आली होती. पण अद्याप श्रीबाबागंगादासांचा आशीर्वाद खरा व्हावयाचा होता; म्हणूनच की काय श्रींना बरे वाटले. मध्यंतरी दोन-तीन महिने गेले, तोवर श्रींची तब्येतही पूर्ववत् उत्तम झाली.     🌹 अनिवार काव्यस्फूर्ती 🌹 श्रावण महिना लागला आणि श्रींना अनिवार काव्यस्फूर्ती होऊ लागली. 'सांगतसे मज तो रघुराणा । मम आज्ञा ऐके प्रज्ञाना । (१०-८-४५) सत्वर करण्या घे तूं हातीं । रामचरित मानस रचना ती ।।१।। अशी श्रीरामाची आज्ञाच झाल्...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १४

Image
प. पू. श्री  प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -  भाग १४ ...........गुरुद्रोही म्हणून मेला          यानंतर श्रींच्या असे दृष्टीस आले की, तो तीर्थयात्रेस न जाता जुन्नर येथेच राहिला असून आपणास शरण येण्यापूर्वीच जारण- मारणादि शिकला होता. तेव्हा मार्गशीर्षात त्यास जुन्नर येथे परत बजावले की, जुन्नर सोडून पूर्वसंकल्पाप्रमाणे तीर्थयात्रेस जा, नाहीतर येथे कल्याण दिसत नाही ! पण सर्व प्रकारे अनाचारी असल्याने त्याने प्रत्यक्ष सद्गुरुवरच मारणाचा प्रयोग केला.        त्यावेळी चास-कमानलाच श्रींचा मुक्काम होता. एकाएकी रक्ताचे जुलाब होऊ लागले व प्रकृती गंभीर झाली. त्यावेळी श्रींनी मुठभर तुळशीचा पाला वाटला व त्याचा रस फक्त सेवन केला व काही मंत्रोच्चार केला. इतकी अवस्था होती तरी नित्य नियमात खंड पडत नव्हता. पण शेवटी झाले असे की, प्रत्यक्ष ब्रम्हनिष्ठ अशा गुरुवरच केलेला मारणाचा प्रयोग त्या हरीभट्टावरच उलटला. व तो फाल्गुन वद्य ११ ला मढ , तालुका जुन्नर येथे मरण पावला !! त्याची क्रियाही कोणी केली नाही ! श्रींनी हे सर्व ऐकल्यावर...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १३

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १३ हरीभट शिष्यभावाने आला १९४५ साल होते.मार्च महिना सुरु झाला होता. उन्हाळ्याची सुरुवात होती. एक दिवस एक कानडी आप्पा श्रींच्या परिचित अशा एका सज्जनाची चिट्ठी घेऊन चासला येऊन ठेपला. जवळ लोट,भांडे,सोवळे,पांघरूण वैगेरे काहीच नाही. श्रींच्या पुढे येऊन प्रणाम करून ‘हरीभट' म्हणून नाव सांगितले. ‘कुठले राहणार?’ विचारता , सागर,जिल्हा शिमोगा म्हणून उत्तर दिले. वय केवळ १९ वर्षांचे !                                                                                                               ...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १२

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १२ ५.पुणे जिल्ह्यातील वास्तव्य           शके १८६४ मध्ये श्रींनी पौषात चतुर्थाश्रम स्वीकारला. म्हणजे इ.स. १९४३ च्या जानेवारीत. पुढे फेब्रुवारीत १२/२/१९४३ ला दंडग्रहण विधी पार पडला. यावेळीही श्रींचा मुक्काम केदारेश्वराच्या मठातच होता.         त्या वर्षीचा चातुर्मास खेडला मठातच झाला. नित्य रामायणावर प्रवचने चालूच असत.याचवेळी सामुदायिक सत्यनारायणाचे अनुष्ठान तेथील लोकांकडून करवून घेण्याचे श्रींच्या मनात आले. मठाधिपती वगैरे काही मंडळी म्हणाली की,बाजारात साखर,गहू,रवा मिळत नाही व एक महिना असले अनुष्ठान होणे शक्य नाही. पण एकंदर ८० सत्यनारायण झाले. त्यात सर्व लोकांनी भाग घेतला होता. समाप्तीला भंडाराही झाला. आदिशक्तीचे साक्षात् दर्शन      खेडला मठात राहत असतानाच तेथे नवीन बांधलेल्या गुहेत ध्यानास बसल्यावर सहज, इच्छा नसता, हृदयात आणि बाहेर श्री आदिशक्तीचे जे दर्शन झाले, {जून-जुलै १९४४} त्याचे वर्णन श्रींनी पुढीलप्रमाणे करून ...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग ११

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - ११ प्रज्ञावासुदेव अमर झाले             याप्रमाणे हा मणिकांचन योग जुळून आला. श्रीसद्गुरु कितीही थोर असले तरी त्या योग्यतेचा शिष्य नसेल तर त्यांचे मोल चढत नाही. निवृत्तीनाथांचे ज्ञानेश्वरांमुळे,समर्थांचे कल्याणस्वामींमुळे गुरुत्व सार्थ ठरले. या सर्व अलौकिक गुरुशिष्य जोड्यांप्रमाणे श्री वासुदेवानंदांचे नावाचा जयजयकार करून श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचा कीर्तिध्वज आभाळात उंच फडकाविला. ‘प्रज्ञावासुदेव’ हे नाव अजरामर झाले. नाहीतर भारतात ब्रह्मनिष्ठ, अत्यंत श्रेष्ठ अशा पुरुषांची उणीव नाही. पण त्याच तोडीचे शिष्य मिळाले म्हणजे त्या शिष्यांमुळेच श्रीगुरुंनाही अधिक कृतार्थता प्राप्त होते. त्यांचे नाव त्रिभुवनात दुमदुमू लागले. तुमचे गुरुबंधू तुम्हीच            केवळ संकल्पाने शक्तिपात करण्याची अद्भुत शक्ती श्री महाराजांच्या ठिकाणी होती,  हे श्रींच्या तत्काळ पूर्णपणे अनुभवास आले. आणखी एक विचित्र प्रकार असा घडला की, नामकरणाच्या वेळी श्रींनी महार...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १०

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - १० अंतरीच्या वृत्ती उफाळून आल्या           सन १९४० च्या जुलैपासूनच खेड , जि.पुणे येथे श्री केदारेश्वराच्या मागील मठात निवास असतानाच आळे येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे } स्वामी महाराज यांच्याबद्दलची परस्परविरुद्ध अशी पुष्कळ माहिती श्रींना कळली होती. पैसे , दागदागिने वगैरे मागतात,घेतात, संग्रह करतात,  इत्यादी सर्व विक्षिप्त वृत्तीची हकीकत कळली होती. पैसे घेणाऱ्या आणि संग्रह करणाऱ्या संन्याश्याचे मुखावलोकन करू नये, असे पूर्वाश्रमात श्रींना वाटत असे. हे सर्व माहित असून दिवसेंदिवस अंतरातून श्रींना अशी स्फूर्ती होऊ लागली कि, ते श्रोत्रिय ब्रम्हविद् वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान होण्यास त्यांच्या चरणावर शिष्यभावाने डोके ठेवणे जरूर आहे. ही अंतरीची वृत्ती , स्फूर्ती { Inner Voice } बळावत गेली. व १८-१-१९४३ ला खेड येथे चतुर्थाश्रम स्वीकारल्यानंतर दंड ग्रहण करण्यासाठी श्रींनी श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे स्वामी } यांचेकडे जाण्याचे ठरविले.         श्री. प....

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग ९

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - ९ गायत्री पुरश्चरण खेडच्या केदारेश्वर मंदिरातील मठात वास्तव्य व्हावे असा ईश्वरी संकेत होता. येथे श्रींचे मन रमले. व तेथे राहून २४ लक्षात्मक गायत्री पुरश्चरण अयाचित वृत्तीने पूर्ण करावे अशी वृत्ती उठली. व त्याप्रमाणे सर्व तयारी करून यंत्रपूजेसह नित्य गायत्रीच्या जपानुष्ठानास प्रारंभ झाला. १९४१ साली आरंभलेले हे पुरश्चरण २१ महिन्यांनी १९४२ मध्ये पूर्ण झाले.            या काळात सतत नंदादिपही ठेवला होता. एकदा रात्री झोप लागली असता कुणीतरी ‘अरे उठ ,दिव्यात तेल घाल ' असे म्हटल्याने एकदम जग आली तर खरोखरच तेल संपत आले होते. पटकन हातपाय धुऊन तेल घातले. अशा रीतीने अगदी यथासांग हे अनुष्ठान पूर्ण झाले. प्रवचन सेवेचा आनंद           फेब्रुवारी १९३७ मध्ये नोकरी सोडल्यापासून साधारणपणे जेथे जेथे मुक्काम होई तेथील देवळात तुलसीरामायणावर प्रवचने देत असत. अगदी प्रथम संपूर्ण रामायणावर प्रवचने करण्यास ५ महिने लागले होते, पण उत्तरोत्तर हा काळ वाढत...