प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १
।। श्रीरामसमर्थ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ।। ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। सद्गुरूचरित असे हो अनंत । ठाऊक समस्त कोणा होय। । वर्णाया नवचे चरित्र हो याचे । ओढे हे मनाचे प्रेमास्तव।। ( श्रीसमर्थपाठ - श्री श्रीधरस्वामी कृत ) नमस्कार सज्जनहो….. आजपासून आपण प.पू श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्राचा रोज थोडा थोडा भाग पाहूया. प.पू.प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र त्यांच्या अंतरंग शिष्या व स्वामींच्या उत्तराधिकारी प.पू. डाॅ.श्रीमती कमलताई बाळकृष्ण वैद्य यांनी लिहिलेले हे गोष्टी स्वरुपात उपलब्ध आहे.तेच चरित्र आपण पाहू. प.पू.कमलताई यांनी स्वामी हयात असताना,स्वामी समक्ष साधना केलेल्या साधक आहेत. स्वामींचा त्यांना तीस ते पस्तीस वर्षे सहवास लाभला आहे. या चरित्रामध्ये स्वामींचा कुलपरिचय, स्वामींचा जन्म, बालपण, तरूणपणातील तपश्चर्या, स्वामींना अनुग्रह, बाबा गंगादासांचा सहवास ,रामायणाची गोडी, प.पू वासुदेवानंद सरस्वती स्वामीं कडून संन्यास दीक्षा, यांचे चमत्कार ...