Posts

Showing posts with the label manas

आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांसाठी काय करू शकतो?

🍂🍁आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींसाठी काय करू शकतो? 🍂🍁 🌸श्रीस्नामींनी सांगितल्याप्रमाणे आचार-विचाराचे होईल तेवढे जास्तीत जास्त पालन करणे.  🌸नाम घेणे व नामच हे साधन तसेच साध्य मानून नामातच राहणे.  🌸प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी कृत मराठी तुलसीरामायणाचे तसेच गोस्वामी तुलसीदास रचित मूळ श्रीरामचरितमानसाचे वाचन, मनन, चिंतन करणे.  🌸श्रीस्वामींच्या साहित्याचा शक्य तेवढा अधिकाधिक अभ्यास करणे.  🌸श्रीस्वामींच्या समाधीचे दर्शन घेणे. ( सहज परंडा, धाराशिव-उस्मानाबाद या भागात गेल्यावर, किंवा फाल्गुन वद्य दशमीला श्रींचे पुण्यतिथी उत्सवाचे वेळी, गुरुपौर्णिमा, रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती, इ. विशेष प्रसंगी)  🌸श्रीस्वामींच्या समाधीमंदिरातील व्यवस्थेसाठी तन-मन-धनाने हातभार लावणे.  🌸श्रीस्वामींचे चरित्र (whats app वरील २४ भागांचे) जास्तीतजास्त व्यक्तींपर्यंत पोहचवणे.  🌸समारंभाच्या वेळी भेटवस्तू म्हणून श्रीस्वामीलिखित पुस्तके देणे.  🌸सहज भेटल्यावर देखील, समाजात चर्चा करतांना सहज श्रीस्वामींविषयी आपल्याला भावलेली माहिती...

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

।। श्रीरामसमर्थ ।। ।। जय जय रघुवीर समर्थ।।  ।। श्रीराम जय राम जय जय राम ।। सद्गुरूचरित असे हो अनंत । ठाऊक समस्त कोणा होय। । वर्णाया नवचे चरित्र हो याचे । ओढे हे मनाचे प्रेमास्तव।।                 ( श्रीसमर्थपाठ - श्री श्रीधरस्वामी कृत )  नमस्कार सज्जनहो….. आजपासून  आपण प.पू श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्राचा रोज थोडा थोडा भाग पाहूया. प.पू.प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे चरित्र त्यांच्या अंतरंग शिष्या व स्वामींच्या उत्तराधिकारी प.पू. डाॅ.श्रीमती कमलताई बाळकृष्ण वैद्य यांनी लिहिलेले हे गोष्टी स्वरुपात उपलब्ध आहे.तेच चरित्र आपण पाहू. प.पू.कमलताई यांनी स्वामी हयात असताना,स्वामी समक्ष साधना केलेल्या साधक आहेत. स्वामींचा त्यांना तीस ते पस्तीस वर्षे सहवास लाभला आहे. या चरित्रामध्ये स्वामींचा कुलपरिचय, स्वामींचा जन्म, बालपण, तरूणपणातील तपश्चर्या, स्वामींना अनुग्रह, बाबा गंगादासांचा सहवास ,रामायणाची गोडी, प.पू वासुदेवानंद सरस्वती स्वामीं कडून संन्यास दीक्षा, यांचे चमत्कार ...
Image
प्रज्ञानबोध - प. प. श्रीमत् प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचा साधकोपयोगी बोध (संदर्भ: श्रीप्रज्ञानानंद स्वामी महाराज चरित्र लेखिका - प. पू. कमलताई वैद्य ) १.पूजा - 'यथा देहे तथा देवे' या भावनेने करावी. २.सगुणोपासनेसाठी नियमित वेळ, नियमित स्थळ,जागा एकांत, पवित्र असावी. आसन स्वतंत्र असावे. ते कुणास वापरू देऊ नये. ३.माळ वाटेल तेथे ठेवू नये. व्यवस्थित डबीत वा गोमुखीत ठेवावी. ४.नियमित  वेळी ध्यानास बसल्यास हळूहळू त्या विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारचा सुगंध येणे, विशिष्ट नाद ऐकू येणे वगैरे अनुभव येऊ लागतील. ५.१.परनिंदा    २.परदोषवर्णन    ३.असत्यभाषण, इ. साफ सोडले पाहिजे. ६.ज्ञानाची वा मोक्षाची इच्छा बाळगू नका. ७.ज्ञान म्हणजे 'मी ब्रम्ह आहे' हे कधी न विसरणे. ८.मी' आणि 'माझे' वाटणे म्हणजे बंध आणि 'मी' आणि 'माझे' असे काही नसून 'सर्व ब्रम्ह आहे' असे न विसरणे म्हणजेच मोक्ष. ९.हरिभक्ती प्राप्तीसाठी डोळ्यात पाणी आणून कळवळून प्रभूला प्रार्थना करीत जा. अशा भक्तीप्राप्तीसाठी तळमळणा-याला ज्ञान सहज प्राप्त होते. १०.अभिनव रामायणातील ...

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी

Image
 आजपर्यंत अनेक थोर-थोर, महान, परमअधिकारी प्रतिभाशाली संत-सत्पुरूषांच्या समाधी दुर्लक्षित होत होत नामशेष झाल्या. आज अनेक समाधीमंदिर केवळ नावापुरतीच शिल्लक आहेत. ही समाधी नेमकी कोणत्या सत्पुरूषाची हेच माहित नसल्याने, तिथे कोणतीही व्यवस्थाही नसल्यामुळे अक्षरशः *बेवारस*म्हणावी अशी अवस्था यांची होत आहे.      अनेक रामदासी तसेच इतरही पुरातन, परंपरागत मठ-मंदिर, समाधी यांची जर माहिती नवीन पिढीला झाली नाही तर हीच अवस्था आणखी बळावयास फार अवधी लागणार नाही. तेव्हा आपणा सर्वांना यानिमित्ताने एकच नम्र विनंती आहे, आपल्याला माहित असलेला पुरातन ठेवा - मठ-मंदिरे, सत्पुरूषांची समाधीस्थाने इ. सर्व त्याच्या यथायोग्य माहात्म्यासहित आपण अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसारित करावीत व आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या जोपासनेत आपापला वाटा उचलावा.महापुरूषांच्या माहात्म्य वर्णनानेच जनमानस आकर्षित होईल, असे वाटते. तेव्हा अशाच एका थोर महापुरूषाच्या माहात्म्यवर्णनाने याची सुरूवात करूया. *परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज* (समाधीस्थान: परंडा, जि. धाराशिव, महाराष्ट्र ) '...