श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे संक्षिप्त चरित्र
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे संक्षिप्त चरित्र परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी हे आपल्या प्राचीन सनातन वैदिक हिंदू संस्कृतीतील एक अद्भुत विभूतीमत्व एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. यांनी संपूर्ण गोस्वामी तुलसीदास रचित 'श्रीरामचरितमानस' या रामायणग्रंथाचा समवृत्त-समछंद अनुवाद करून त्यावर विस्तृत टीका लिहिली. म्हणूनच श्रीस्वामी 'महाराष्ट्राचे तुलसीदास' या नावाने विख्यात आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे कर्ममार्गाचे आचरण आणि तितक्याच उच्चप्रतीची निष्ठावंत, निष्काम श्रीरामभक्ती आपल्याला श्रीस्वामींच्या जीवनात पहावयास मिळते. आपला प्रपंच नेटका करून परमार्थातील अत्युच्च शिखर कसे गाठावे याचा वस्तुपाठ म्हणजेच श्रीस्वामींचे चरित्र होय. पूर्ववृत्तांत श्रीस्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव श्री. दत्तात्रय नारायण कर्वे. मूळस्थान मुक्काम गिम्हवणे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. गार्ग्य गोत्र कोकणस्थी ब्राह्मण. श्रीहरिहेश्वर व श्रीजोगेश्वरी ही यांची कुलदैवते. श्री. नारायणराव म्हणजे श्रींचे वडील हे शिक्षक होते, ...