प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १६ 🌹 गुरूचरणी अनुवादनमानस अर्पण 🌹 लगेचच श्री आळ्याच्या महाराजांना पत्र लिहून याप्रमाणे अनुवाद लिहून झाल्याचे कळविले व दर्शनाविषयी अनुज्ञा मागितली. ता. ६/११/४५ व ७/११/४५ या दोन दिवसांत श्रीरामाची, बाबा गंगादासांची व श्रीरामायणाची वगैरे विविध आरत्या तयार झाल्या व तोपर्यंत श्रींची अनुज्ञा मिळाल्याने श्रीमहाराजांचे दर्शनास श्रींचे जाणे झाले. श्रींनी श्री आळ्याच्या महाराजांना मराठी रामचरितमानस (हस्तलिखित) वाचून दाखविण्यास सुरूवात केली. ते जसजसे वाचू लागले, तसतसे श्री आळ्याच्या महाराजांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. काही ठिकाणी तर ते अगदी हुंदके देऊन ओक्साबोक्शी रडूच लागले. इकडे श्रींचाही वाचताना कंठ भरून येऊन, डोळ्यांतून अश्रुधारा अशी कठीण अवस्था होऊ लागली. शेवटी अशा रीतीने मधूनच थांबत, तो अनुवाद श्रीमहाराजांना अधून मधून वाचून दाखविला व त्यांचा अभिप्राय व आशीर्वाद मागितला. तेव्हा असा असा लिहून आणा म्हणून आज्ञा झाली व त्याप्रमाणे लिहून आल्यावर श्री आळ्याच्या महाराजांनी खाली सही केली. तो अभिप...