प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १५
प . पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १५ 🌹 आमुची चिंता रघुरायाला 🌹
असो. याप्रमाणे फाल्गुनात (१९४५ मार्च असावा) याप्रमाणे या शिष्यांमुळे श्रींना हे सर्व क्लेश सोसावे लागले. तब्येत जरा सुधारली न सुधारली तोच चैत्रात पुन्हा मुदतीचा ताप आला. यावेळी तर नाडीही लागेना अशी अवस्था एकवेळ आली होती. अर्थात् तरी पूर्ण शुद्धीवर होते व 'रामास आमची सर्व चिंता आहे. तुम्ही काळजी करू नका किंवा कुणाला सेवेसाठीही बोलवू नका. स्वस्थ पडू द्या, फार तर प्यायला पाणी तेवढे द्या,' असे सांगितले.
खरेतर समाधीचीच वेळ आली होती. पण अद्याप श्रीबाबागंगादासांचा आशीर्वाद खरा व्हावयाचा होता; म्हणूनच की काय श्रींना बरे वाटले. मध्यंतरी दोन-तीन महिने गेले, तोवर श्रींची तब्येतही पूर्ववत् उत्तम झाली.
खरेतर समाधीचीच वेळ आली होती. पण अद्याप श्रीबाबागंगादासांचा आशीर्वाद खरा व्हावयाचा होता; म्हणूनच की काय श्रींना बरे वाटले. मध्यंतरी दोन-तीन महिने गेले, तोवर श्रींची तब्येतही पूर्ववत् उत्तम झाली.
🌹 अनिवार काव्यस्फूर्ती 🌹
श्रावण महिना लागला आणि श्रींना अनिवार काव्यस्फूर्ती होऊ लागली. 'सांगतसे मज तो रघुराणा । मम आज्ञा ऐके प्रज्ञाना । (१०-८-४५) सत्वर करण्या घे तूं हातीं । रामचरित मानस रचना ती ।।१।। अशी श्रीरामाची आज्ञाच झाल्याने श्रावण शुद्ध द्वितीया शके १८६७ (गुरूवार ता. १०-८-४५) श्रीरामचरित मानसाचा ( दोहा, चौपाया, सोरठा, छंद, इत्यादि मूळाप्रमाणे तंतोतंत) समवृत्त-समच्छंद अनुवाद लिहिण्यास श्रींनी सुरूवात केली. आणि काय आश्चर्य, अवघ्या तीन महिन्यांत (खरे तर २/३ दिवस कमीच) संपूर्ण श्रीरामचरितमानसाचा अनुवाद लिहून झाला. श्रीरामचरितमानस ग्रंथ विस्ताराने वास्तविक श्रीज्ञानेश्वरी एवढा आहे. आणि हा अनुवाद केवळ तीन महिन्यांत (मानसांत सुमारे दहाहजार चौपाया आहेत.) लिहिला जावा हा खरोखर आजच्या युगातील एक महान चमत्कार म्हटला पाहिजे. तो अनुवादही फारच सरस उतरला आहे. शिवाय, मुळातील गोडी कायम आहेच. कोणीही दोन्हीची तुलना करून खात्री करून घ्यावी. श्रींच्या मते हे सर्व श्रीबाबागंगादासांच्या आशीर्वादाचे व श्री आळ्याच्या महाराजांच्या कृपेचे फळ होते! 'तुलसीदासजी तेरे मुखसे बोलेंगे' हा बाबांचा आशीर्वादच फलद्रूप झाला. श्रींनी म्हटल्याप्रमाणे 'प्रज्ञा लिही यन्त्रसा' हेच खरे! कारण कुणीही विचार करून हा अनुवाद करावयाचा प्रयत्न केला असता तरी इतक्या अल्प मुदतीत हे कार्य झाले असते की नाही हे सांगणे कठीण! हे तीन महिने कसे भारल्यासारखे गेले असतील व श्रींचे विषयाशी किती तादात्म्य झाले असेल हे अनुवाद वाचल्यानंतर जाणवते! धन्य ते संत, की ज्यांच्या केवळ आशीर्वादाने अशी महान कार्ये केवळ चुटकीसरशी होतात!
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
लेखिका : श्रीमती कमलताई बा.वैद्य
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
Comments
Post a Comment