प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी
आजपर्यंत अनेक थोर-थोर, महान, परमअधिकारी प्रतिभाशाली संत-सत्पुरूषांच्या समाधी दुर्लक्षित होत होत नामशेष झाल्या. आज अनेक समाधीमंदिर केवळ नावापुरतीच शिल्लक आहेत. ही समाधी नेमकी कोणत्या सत्पुरूषाची हेच माहित नसल्याने, तिथे कोणतीही व्यवस्थाही नसल्यामुळे अक्षरशः *बेवारस*म्हणावी अशी अवस्था यांची होत आहे.
अनेक रामदासी तसेच इतरही पुरातन, परंपरागत मठ-मंदिर, समाधी यांची जर माहिती नवीन पिढीला झाली नाही तर हीच अवस्था आणखी बळावयास फार अवधी लागणार नाही. तेव्हा आपणा सर्वांना यानिमित्ताने एकच नम्र विनंती आहे, आपल्याला माहित असलेला पुरातन ठेवा - मठ-मंदिरे, सत्पुरूषांची समाधीस्थाने इ. सर्व त्याच्या यथायोग्य माहात्म्यासहित आपण अधिकाधिक लोकांपर्यंत प्रसारित करावीत व आपल्या महान भारतीय संस्कृतीच्या जोपासनेत आपापला वाटा उचलावा.महापुरूषांच्या माहात्म्य वर्णनानेच जनमानस आकर्षित होईल, असे वाटते. तेव्हा अशाच एका थोर महापुरूषाच्या माहात्म्यवर्णनाने याची सुरूवात करूया.
*परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज*
(समाधीस्थान: परंडा, जि. धाराशिव, महाराष्ट्र )
'महाराष्ट्राचे तुलसीदास'या नावाने सुप्रसिद्ध असणारे, अध्यात्मशास्त्रामध्ये आपल्या अधिकाराने एक वेगळा-आगळा ठसा उमटवीत उभी हयात श्रीरामभक्तीतच व्यतीत करणारे, वेदशास्त्रादि नियमांचे अत्यंत कटाक्षाने, काटेकोरपणे पालन करणारे प्रातःस्मरणीय, नित्यवंदनीय, परमदयाघन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच पूर्वाश्रमीचे श्री. दत्तात्रेय नारायण कर्वे.हे दंडी स्वामी- दंडधारक संन्यासी होत.(संन्यासांमधील प्रकारात दंडधारक हे सर्वश्रेष्ठ होय.) हे मूळचे राहणारे कोकण प्रांतातील होत. जन्मतःच अत्यंत विरक्त. जिज्ञासू वृत्ती, चिकाटी, एखादी गोष्ट मनावर घेतली की त्याची पूर्तता, प्राप्ती होईपर्यंत काही झाले तरी मागे हटायचे नाही हे स्वभावगुण. बुद्धी अत्यंत तल्लख.
यांना आयुष्यात एकूण ३ गुरू लाभले. पहिल्या गुरूंना यांनी मंत्रोपदेश करण्याविषयी विनंती केली तेव्हा आधी ३ कोटी *'श्रीराम जय राम जय जय राम'*या त्रयोदशाक्षरी तारकमंत्राचा जप करून ये अशी यांना आज्ञा झाली. तेव्हा स्वामी गृहस्थी असून शिक्षकी पेशा चालवीत. संस्कृत, गणित, इ. विषय ते अगदी सुंदर पद्धतीने शिकवीत. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा संपल्यावर घरी पुन्हा मोफत वर्ग घेत असत.शाळेच्या मधल्या सुटीतसुद्धा स्वामी घरी येऊन हात-पाय धुवून १ तास जपास बसायचे. दुपारच्या तासाच्या वेळेला पुन्हा शाळेत हजर रहात असत. दैनंदिन शाळा, मोफत वर्ग व प्रापंचिक जबाबदारी, इ. सर्व सांभाळून स्वामींनी अवघ्या कमी कालावधीत साडेतीन कोटी मंत्र जप पूर्ण करून गुरूंच्या भेटीला निघाले. गुरूंनी केवळ पाहता क्षणीच जे ओळखायचे ते ओळखले आणि स्वामींना पुढचा मार्ग दाखविला.
स्वामींचे दुसरे गुरू म्हणजे बाबा गंगादास. मोठे प्रेमी संत होते हे ही. उत्तरेकडील होत. हिंदी बोलत. एक दिवस बाबा गंगादास एका ठिकाणी काही समुदायासोबत बसले असता स्वामी समोरून येत होते. स्वामींना बाबा गंगादासांविषयी माहिती नव्हती. ते सहजच येत होते. स्वामींना पाहून बाबा म्हणाले, "चोर! चोर है वो! चोरी करने वाला है!" सोबतच्या समुदायास काही विशेष कळाले नाही;पण बाबा गंगादासांनी हा आता माझ्याकडून ज्ञान-भक्तीची चोरी करणार हे पाहता क्षणीच ओळखले होते. बाबा गंगादासांनी स्वामींना जवळ बोलावून घेतले. जवळ बसवले. कळवळून विचारले, " कहाॅं थें अब तक? आपकी प्रतिक्षा करते करते मैं काफी बूढा़ बन गया। याद नहीं आइ आपको ?" बाबांना स्वामींविषयी अपार प्रेम वाटे. मी याच्यासाठी कायकाय करू अन् काय नको असे त्यांना व्हायचे अगदी रामकृष्णांना नरेंद्राविषयी व्हायचे तसे! स्वामीसुद्धा बाबांविषयी अत्यंत आदर-श्रद्धाभक्ती बाळगत. मध्यरात्रीनंतर पहाटेपूर्वी बाबा रोज शिवपूजन करत असत. तेव्हाही स्वामी सोबत असत. एका रात्री मध्यरात्रीनंतरचे शिवपूजन संपले आणि बाबांनी स्वामींना जवळ बोलावून - 'आता नीट ऐक. तुला एकाच वाक्यात साऱ्या वेदशास्त्राचा उपदेश करीन' असे अत्यंत प्रेमपूर्वक म्हणाले. त्याबरोबर स्वामींना ज्ञान झाले. सोबतच आशीर्वाद दिला, " तेरे मुखसे स्वयं तुलसीदास बोलेंगे।" श्रीतुलसीदास कृत रामचरितमानसावर भाष्य करण्याविषयी आज्ञा केली. (श्री बाबा गंगादासांचे स्वतंत्र चरित्र श्रीस्वामींनी लिहिले आहे. )
स्वामींचे तिसरे गुरू म्हणजे त्यांचे संन्यास-दीक्षागुरू - परमवंदनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच आळ्याचे (हे गावाचे नाव असावे. ) पोटे स्वामी महाराज. अत्यंत अत्यंत विरक्त, निस्पृह, विरागी परंतु सर्वांवर स्वपुत्रवत् निरतिशय प्रेम करणारे असे होत. बाह्य हावभाव, कृती, इ. वरून मी साफ वेडा आहे असे दाखवून आपला अधिकार लपवित असत; परंतु तयारीचा साधनसंपन्न साधक दिसताक्षणी त्यावर कृपा करून मोकळे होत. स्वामींना यांच्याकडूनच दंड प्राप्त झाला. यानंतर स्वामींनी त्यांच्या गुरूंची अखेरपर्यंत खूप सेवा केली. शेवटच्या काळात आळ्याच्या स्वामी महाराजांचे देहास काही दुर्धर आजार जडल्या कारणाने सर्व शरीरसुलभ क्रिया जागेवरच होऊ लागल्या. तेव्हा स्वामी स्वहस्ते सर्व स्वच्छता करून आळ्याच्या स्वामी महाराजांस उचलून टोपल्यात ठेवून स्नान घालून कोणताही विषाद न मानता, मनोभावे स्वच्छ करीत. हा प्रकार दिवसातून वरचेवर अनेकदा होत असे. एकदा स्वामी आळ्याच्या स्वामी महाराजांना म्हणाले, "सर्व काही आपल्या हातात असताना एवढे भयंकर भोग कशासाठी?" तेव्हा आळ्याचे स्वामी म्हणाले, " देहाचे भोग देहाचे माथी. आपण समाधी लावून घ्यायची. देहास भोग आहेत. आपणास नाही."
स्वामींची साहित्यनिर्मितीसुद्धा प्रचंड आहे.
संपूर्ण रामचरितमानसाची सम-छंद, समवृत्त मराठी समश्लोकी, संपूर्ण रामचरितमानसावर *'मानस गूढार्थ चंद्रिका'*ही *११ खंडांची ७५०० पृष्ठसंख्या* असलेली रामायणातील प्रत्येक कांडानुसार अत्यंत सविस्तर बृहत् टीका आहे. मानस गूढार्थ चंद्रिका याच्या केवळ प्रस्तावनेचाच ७०० पानांचा एक खंड आहे. यावरून याच्या विशालतेची कल्पना करता येईल. या टीकेमध्ये १.रामचरितमानस मूळ हिंदी दोहा/श्लोक
२ . त्याच दोहा/श्लोकाचे श्रीस्वामी कृत समछंद-समवृत्त समश्लोकी मराठी रूपांतर
३. प्रत्येक चरणाचे इतर रामायणातील(वाल्मिकी रामायण, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, शांतीब्रम्ह श्रीएकनाथ महाराज कृत रामायण) प्रस्तुत प्रसंगावरील साम्य-भेद तथा वेदशास्त्र, संतसाहित्य(ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम महाराजांचा गाथा, दासबोध) , इ. प्रमाणांसहित अत्यंत सविस्तर वर्णन
असा वर्णनक्रम दिसतो. रामायणातील प्रत्येक घटनास्थळी जाऊन तेथील अभ्यास करून त्या स्थळावरून पुढच्या स्थळी पायी जाण्यास किती वेळ लागतो, रामरायांना किती लागला, इ. अत्यंत सविस्तर सप्रमाण आधारभूत माहिती दिली गेली आहे.
याखेरीज समश्लोकी भगवद्गीता, समश्लोकी गुरूगीता, अभंग, मानवतापूर्ती संध्योपासना तसेच अनेक प्रसंगोपात्त कविता, इत्यादींचा समावेश होतो.
स्वामींच्या चरित्रात अनेक दिव्य प्रसंग आहेत. त्यापैकी काही पाहुया.
१. प्रज्ञानानंद स्वामी महाराज 'शीतोष्ण सुखदुःखेषु समः'कसे होते याचे एक उदाहरण आमचे गुरूजी नेहमी सांगत.
स्वामींच्या गृहस्थाश्रमातील घटना आहे. स्वामींना मुलगा झाला.... स्वामींना मुलगा झाला.... ही आनंदाची बातमी वायुवेगाने अजून पसरतच होती. स्वामी पेढे वाटत होते. परंतु ते वाटताना २-२ पेढे वाटत होते. काही जणांनी काही न विचारताच २ पेढे खाल्ले; परंतु काही चिकित्सकांनी पृच्छा केली असता स्वामी उत्तरले' *" एक पेढा मुलगा झाल्याचा व दुसरा गेल्याचा"* खरोखरच केवढा थोर अधिकार?
२. स्वामी ध्यानास बसल्यास ज्या देव- देवतेचे आवाहन करत ते प्रत्यक्ष येत असत व विसर्जन केल्यावर परत जात असत. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेली एक व्यक्ती धाराशिव येथे आजही आहे. (प्रस्तुत उल्लेख हा स्वामीशिष्या प. पू. कमलताई वैद्य लिखित श्री प्रज्ञानानंद स्वामी महाराज चरित्र यातील असून ही व्यक्ती प्रस्तुत पुस्तकाचे प्रकाशन काळी हयात होती असा अर्थ आहे. सध्या हयात आहे किंवा नाही हे माहित नाही. ) स्वामींचा मुक्काम धाराशिवमध्ये होता. सामान्यतः स्वामी मुक्कामाच्या ठिकाणी गच्चीवरील खोलीत एकटेच राहत. तसे होते. ध्यानास बसले आणि शंकर-पार्वतींच आवाहन स्वामींनी केल. वाड्यामध्ये ओसरीसमोर एक लहान पोर खेळत होती. आणि तिला ते शंकर-पार्वती नंदीवर आरूढ होऊन येताना दिसले. चित्रात पाहिलेले शंकर-पार्वती पाहिल्याने तिला खूप आनंद झाला व बालसुलभ वृत्तीने ती टाळ्या वाजवत शंकर-पार्वती... शंकरं पार्वती... असे मोठ्याने म्हणत उड्या मारू लागली. स्वामी लगेचच खोलीच्या बाहेर खाली आले व पोरीला आत घेऊन खोलीचे दार लावले. खरोखरच काय थोर भाग्य त्या मुलीचे! साक्षात् शंकर-पार्वतींच दर्शन! अहो भाग्य! स्वामींनी तिला शंकर-पार्वतींना शिरसाष्टांग दंडवत् घालण्यास सांगितले. तिच्या मस्तकी स्वतः वरदहस्त ठेवून झालेला प्रकार तू विसरून जाशील. योग्य वेळी तो पुन्हा आठवेल असे वदले.
इतकच नव्हे स्वामींच्या समोर आसन घालून ध्यानाभ्याासाला बसले असता नवीन अभ्यास करणाऱ्याला सुद्धा अनेक दिव्य अनुभव येऊन प्रत्यक्ष दर्शनही होत असे.
३. स्वामी सज्जनगडावरही काही काळ वास्तव्यास होते. स्वामी त्यावेळी संन्यासी नव्हते. तेव्हा ते स्वतःस *'ईश्वरदास रामदासी'*म्हणवत. त्यावेळीचे एक छायाचित्र देखील सोबत जोडत आहे. स्वामींचा प. प. भगवान श्री श्रीधर स्वामी महाराज, प. पू. श्री अनंतदास महाराजांशी अनेकदा पत्रव्यवहार होत असे. योगमार्गातील अग्रणी प. पू.श्री गुळवणी महाराजांकडूनही स्वामींना काही दीक्षा प्राप्त झाली होती, असा उल्लेख आहे.
४.स्वामी संन्यास स्वीकारल्यानंतर पैशास स्पर्शही करत नसत. प्रवासात एक व्यक्ती तिकीट काढण्यासाठी स्वामींच्याच खर्चातून स्वामींसोबत असे. एकदा एका व्यक्तीने एक लाडू स्वामींना दिला. तो लाडू खात असताना आतमध्ये नाणं लागल असता लगेच स्वामींनी स्नान करून शुद्धी केली असे वर्णन आढळते.
५.स्वामींच्या संपूर्ण आयुष्यात संध्यावंदनाची वेळ एखादा अपवाद वगळता कधीच चुकली नाही. प्रवासातही कोणत्या स्टेशन वरून कुठे किती वाजता पोहोचणार, किती वेळ थांबणार, तेवढ्या वेळात आन्हिक कसे करायचे, त्या दिवशीचा त्या स्थळाचा सूर्योदय/सूर्यास्त किती वाजता आहे, त्यानुसार तिथे कुठे संध्यास्नानादिक करायचे, ते आटोपून पुढची/तीच गाडी किती वाजता पकडायची आहे, इत्यादी सर्व आखीव-रेखीव नियोजन केलेले असे. त्याकाळी गाड्यांच्या वेळा, थांबे, crossing, इ. आजसारखे internet वर समजत नसतानाही एवढी सुनियोजित तीर्थयात्रा म्हणजे अजबच म्हणावी लागेल.
६. स्वामी (इ. स. १९६८) प्रायोपवेशनास बसले असता त्यांच्या मुखमंडलाभोवती स्वयंप्रकाशित तेजोवलय निर्माण झालेले प्रत्यक्ष पाहिलेली मंडळी आज इ. स. २०१७ (शके १९३९) मध्येही हयात आहेत. त्यावेळचे छायाचित्रही उपलब्ध आहे. स्वामींच्याच शिष्याने काढलेले. हे आजही (इ. स. २०१७ - शके १९३९) सद्गुरूकृपेने सुस्थितीत जिवंत आहेत. ( ते छायाचित्रही सोबत जोडत आहे.)
यासारख्या अनेकानेक अचंबित करणार्या *प्रत्यक्ष घडलेल्या *घटना*स्वामींच्या चरित्रात पहावयास मिळतात.
(जिज्ञासूंनी संपूर्ण चरित्रच मुळातून वाचावे.)
अशा या अधिकारसम्पन्न श्री स्वामींची परंडा, जि. धाराशिव, महाराष्ट्र येथील समाधी आज मात्र वरचेवर दुर्लक्षित होत चालली आहे.
परंडा येथे
१.श्री स्वामींचे मंदिर (श्रीराम पंचायतन तथा प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी) (खाली फोटो दिला आहे. ) तथा
२.श्रीस्वामींची समाधी अशा २ वास्तू आज पहावयास मिळतात.(खाली फोटो दिला आहे.) (येथे १. प. पू. श्रीहंसराज स्वामी-हे श्रीसमर्थांचे आद्यशिष्य श्रीउद्धवस्वामी यांच्या परंपरेतील श्रीसमर्थांपासून सहावे थोर वेदांती सत्पुरूष,२.प.पू.ब्र.भू.श्री अनंतदास महाराज व ३.प. प.श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज अशा तीन *सुदुर्लक्षित*समाधी आहेत. )
या थोर महात्म्याच्या चरणी कोटी कोटी दंडवत् प्रणाम!!!!
(संदर्भ : श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र- प. पू. कमलताई वैद्य)
(छायाचित्र : वेदशास्त्रसंपन्न श्री अनुप बाळकृष्ण जोशी, पूर्वप्रधानाचार्य, नवीन श्रीराम मंदिर, परंडा, जि. धाराशिव(उस्मानाबाद) महाराष्ट्र.)
जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम.
सद्गुरू श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराज की जय!
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज की जय!

सर, मानस गुढार्थ चंद्रिका मराठी आता कुठे उपलब्ध होईल?
ReplyDelete