प्रज्ञानबोध - प. प. श्रीमत् प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचा साधकोपयोगी बोध
(संदर्भ: श्रीप्रज्ञानानंद स्वामी महाराज चरित्र
लेखिका - प. पू. कमलताई वैद्य )
१.पूजा - 'यथा देहे तथा देवे' या भावनेने करावी.
२.सगुणोपासनेसाठी नियमित वेळ, नियमित स्थळ,जागा एकांत, पवित्र असावी.
आसन स्वतंत्र असावे. ते कुणास वापरू देऊ नये.
३.माळ वाटेल तेथे ठेवू नये. व्यवस्थित डबीत वा गोमुखीत ठेवावी.
४.नियमित वेळी ध्यानास बसल्यास हळूहळू त्या विशिष्ट वेळी विशिष्ट प्रकारचा सुगंध येणे, विशिष्ट नाद ऐकू येणे वगैरे अनुभव येऊ लागतील.
५.१.परनिंदा
२.परदोषवर्णन
३.असत्यभाषण, इ. साफ सोडले पाहिजे.
६.ज्ञानाची वा मोक्षाची इच्छा बाळगू नका.
७.ज्ञान म्हणजे 'मी ब्रम्ह आहे' हे कधी न विसरणे.
८.मी' आणि 'माझे' वाटणे म्हणजे बंध आणि 'मी' आणि 'माझे' असे काही नसून 'सर्व ब्रम्ह आहे' असे न विसरणे म्हणजेच मोक्ष.
९.हरिभक्ती प्राप्तीसाठी डोळ्यात पाणी आणून कळवळून प्रभूला प्रार्थना करीत जा. अशा भक्तीप्राप्तीसाठी तळमळणा-याला ज्ञान सहज प्राप्त होते.
१०.अभिनव रामायणातील वेदांतपर भूपाळीचेच सतत मनन चिंतन करीत जावे.
भक्तीमार्गीय ग्रंथ, तसेच रामायण वगैरे वाचावे व सतत प्रभूनामस्मरण करावे.
११.कोणाच्या दोषाचे वर्णन करू नका.
जग काय करते ते बघू नका. स्वतः काय ते करा.
१२.असत्य कोणत्याही निमित्ताने कोणाशीही एकदा बोलले गेले तरी 'रौरव' नावाच्या नरकात पडावे लागते. असत्यासारखा पापाचा पर्वत नाही.
स्वतःचा प्राण जाणार असला तरी खोटे बोलता कामा नये.
आपल्या खरे बोलण्यामुळे दुसर्या कोणाही मनुष्यादि प्राण्याला मरण येत असेल तर मात्र खरेही सांगू नये व खोटेही बोलू नये. कशातरी वेळी मारून न्यावी.
खोटे कोणाशीच बोलू नये. दुसऱ्यांच्या प्रश्नाचे खरे उत्तर देणे योग्य नसेल तर 'त्याचे उत्तर मी देऊ शकत नाही' असे स्पष्ट सांगावे.
१३.ज्यांच्यावर पुत्रकन्यादि सारखे प्रेम केले ते लोक आपल्याशी जर फटकून वागू लागले तर खंत करू नये. ह्यामुळे ममतारूपी पाश कमी होऊ लागतो. अशा गोष्टी घडू लागल्या की ही भगवंताची कृपा समजून आपण त्यांच्यावरील ममता सोडून वैराग्य वाढवावे व आनंद मानावा. मात्र आपले त्यांच्याविषयीचे जे अत्यंत आवश्यक कर्तव्य ते ममतारहित कर्तव्य कर्म म्हणूनच करीत रहावे. 'जैशास तैसा भेटे। तेव्हां मज्यालसी थाटे।' असेही अधून मधून करावे.
१४.सकाम कर्माचे इच्छित फळ न मिळाले तर शास्त्र आदि खोटे न मानता आपले देहप्रारब्ध समजून शांत राहिले पाहिजे.
१५.मुलांनी नियमांनी मातेला व पित्याला नमस्कार करावा.
१६.आशीर्वाद न दिल्यास आयुष्य कमी होते.
१७.जे प्रारब्धावर सोडावयास हवे ते आपण सोडत नाही आणि जे प्रयत्नांनी साध्य होण्यासारखे ते आपण साधत नाही.
१८.माळ न घेता केलेला जप रोजच्या जपात गणता येणार नाही. *'संख्याहीनः जपः व्यर्थः'* माळ मण्यांचीच हवी असे नाही. जप करमालेने केला तरी चालतो.
१९.नाममंत्राचा जप मनातल्या मनात केव्हाही कशाही स्थितीत केला तरी चालतो मात्र अपवित्र स्थितीत आडवे पडून माळेने जप करणे दोष आहे. एरवी उभ्याने आणि माळ घेऊन करण्यास हरकत नाही.
२०.कुठल्याही प्रसंगात उदा. सोयेर (वृद्धी) वा सुतकांतही ध्यानास बसण्यास हरकत नाही.
२१.जप करताना समोर सद्गुरूंचा किंवा इष्टदेवतेचा फोटो आपल्या डोळ्यांच्या रेषेत सरळ अशा ठिकाणी ठेवावा की त्यांच्यावर(डोळ्यांवर) प्रकाश पडेल. मग डोळे उघडून फोटोतील डोळ्यांकडे बघत जप करावा म्हणजे झोप येणार नाही.
२२.घराच्या बाहेर जमिनीवर मधल्या बोटाने 'राम' नाम लिहून त्याला निदान ४-५ प्रदक्षिणा रोज घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेने पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य लागते अशी दृढ भावना ठेवावी. नंतर हाताच्या बोटांनी 'राम' नाम पुसून तेथील माती डोके, डोळे, कंठ व हृदयावर लावावी.
२३.कितीही अडचणी येवोत साधकाने सद्गुरूवचनावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने, निष्काम भावनेने, चिकाटीने व सातत्याने उपासना चालू ठेवावी.
२४.गुरूपेक्षा अधिक श्रेष्ठ कोणी नाही.
२५.अहंकार, असत्य, परनिंदा, इ. सोडा व प्रभूवर भार घालून त्याचे नाम नेहमी मुखाने उच्चारीत जा म्हणजे प्रभू सर्व काही योग्य तेच करतील.
२६.वृद्ध वडील माणसांची सेवा केल्याचे बक्षिस पारमार्थिक प्रगतीचे रूपाने मिळेलच.
२७.खूप जप करा. जास्त होईल तो मांडून ठेवत जा.
२८.रामायणाची पारायणे घरीच खूप करा.
काकडा आरती वगैरे सर्वांनी घरोघरी करीत असावे.
२९.प्रभूची मूर्ती एक क्षणभर का होईना ध्यानादिकांचे वेळी दिसणे हे परमभाग्य आहे.
३०.रामाच्या फोटोतील डोळ्यांवर निरांजनाचा प्रकाश पडेल असे करून त्या डोळ्यांकडे इतर प्रकाश न ठेवता टक लावून पाणी येईपर्यंत बघण्याचा रोज अभ्यास करा म्हणजे चित्ताची एकाग्रता लवकर साधेल.
३१.भगवंतावर शुद्ध प्रेम थोडे तरी करीत रहाल तोपर्यंत तो तुम्हाला कधीच विसरणार नाही आणि अंतःकाळी तुम्हाला त्याचा विसर पडला तरी त्याला तुमचा पडणार नाही.
३२.भगवंताशी नाते जोडा.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
।। श्रीराम जय राम जय जय राम ।।

Comments
Post a Comment