प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग २

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - २ :- कुलवृत्तांत, बालपण आणि शिक्षण  




मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यतति सिध्दये |
यततामपि सिध्दानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः || .गी. 7-3 ||

         श्री भगवंतांनीच सांगितले आहे की, सहस्त्रावधी मनुष्यामध्ये एखादा (ज्ञानाच्या ) सिध्दीसाठी  प्रयत्न  करतो त्या प्रयत्न करणार्‍या  सिध्द पुरूषांमध्ये एखादाच मला खऱ्या  प्रकारे जाणतो. हे वर्णन ज्या सिध्दपुरूषांना योग्य प्रकारे शोभून दिसावे अशा क्वचित आढळणाऱ्या  सिध्दपुरूषांमध्ये श्रींची गणना होत असल्याने, त्यांच्या थोरवीचे कितीही वर्णन केले तरी अपुरेच ठरेल.
           थोरामोठ्यांचा आश्रय केला तर तो केंव्हाही लाभदायकच ठरतो.” बडे गहे ते होत बड जिमी बामन कर दंडया न्यायाने श्रींसारख्या सत्पुरुषांचे गुणवर्णन करून इतर लाभ तर होतीलच,पण आपलीही चित्तशुध्दी होईल. हाचित्तशुध्दीरूपी प्रसाद या ग्रंथाच्या परिशिलनाने आपल्यालाही प्राप्त व्हावा अशी श्री गुरूंच्या चरणी नम्र विनंती करून, त्यांच्या चरित्रवर्णनास प्रारंभ करीत आहे.

●● पुण्यवंत कुल ●●

          श्रींचे पूर्वाश्रमीचे नाव श्री.दत्तात्रय नारायण कर्वे. कर्वे घराण्याचे मूळस्थान मुक्काम गिम्हवणे,तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. कर्वे हे गार्ग्य गोत्री कोकणस्थ ब्राह्मण. श्री हरिहरेश्वर श्री जोगेश्वरी ही त्यांची कुलदैवते.
            श्रींच्या खापर पणजोबांचे नाव भास्कर होते.  त्यांचे पणजोबा श्रीधर आजोबा गोविंद. गोविंदराव हे ठाणे जिल्ह्यातील बेलापूर येथे राहण्यास आले. त्यांना तीन मुले…...हरी,केशव आणि नारायण. यापैकी श्री नारायण कर्वे हेच श्रींचे वडील.
             श्री.नारायणराव हे प्राथमिक शिक्षक होते. शिक्षकाचा पेशाच जात्या सात्विक. त्यातही श्री नारायणराव हे स्वतः धार्मिक वृत्तीचे होते. संत वाड्मयाची गोडी विलक्षणच होती.हेच संस्कार पुढे श्रींच्या ठिकाणी उतरले.
             नारायणरावांनी ठाणे जिल्ह्यात आगाशीबदलापूरटिटवाळा इत्यादी विविध ठिकाणी नोकरी केलीसेवानिवृत्ती नंतर ते मुरबाडला काही दिवस  आपल्या  चुलत्याकडे राहून चिंचणी ता.माहिम जि. ठाणे येथे रहावयास गेले.
            नारायणराव यास प्रथम पत्नीपासून कृष्णा म्हणून एक मुलगा होता. त्यांचा व्दितीय विवाह माहिम येथील श्री.पेंडसे यांच्या कन्येबरोबर झाला.या दुसर्या पत्नीचे नाव  सौ.गंगाबाई असे होते. याच श्रींच्या मातोश्री होत.विवाहाच्या वेळी त्या अवघ्या अकरा वर्षांच्या होत्या.
                       भारतीय स्त्रियांना पातिव्रत्याचे बाळकडू असतेच. त्याप्रमाणे सौ.गंगाबाई पतिपरायण होत्याच, शिवाय अत्यंत प्रेमळ होत्या. घरातील नोकरचाकरांशीही त्यांचे खेळीमेळीचे वागणे असे .
 ●● नाळ पुरताना हंडा सापडला ●●
          त्या सतरा वर्षांच्याअसताना तारीख 15 मे 1893 या दिवशी  ( वैशाख वद्य 30 ) सोमवारी,  त्यांच्या माहेरी ( माहिम ता.पालघर )येथे आजोळ घरी श्रींचा जन्म झाला.यावेळी श्रींचे मातामह ( आईचे वडील ) घराबाहेर मुलाच्या नाळवारेसाठी खड्डा खणीत असता त्यांना धनाचा कुंभ ( हंडा ) सापडला. श्री हे त्यांच्या मातोश्रींचे पहिले अपत्य. या अपत्याच्या योगानेचकुलं पवित्रं जननी कृतार्थंहे भाग्य त्या माऊलीच्या वाट्यास आले. त्यावेळी खरोखरच त्या माऊलीला कदाचित कल्पनाही नसेल की आपला हा पुत्र महान भगवत् भक्त होणार आहे आपलेच नव्हे तर सर्व कुळाचे नाव उज्वल करणार आहे !
        श्रींचे नावदत्तात्रयठेवण्यात आले , पण लाडाने सर्व त्यांनादत्तूअसे म्हणत. श्रींच्या पाठीवर त्यांची दोन-तीन भावंडे वर्ष दीड वर्षाची होऊन निवर्तली. त्यानंतर तीन भाऊ तीन बहिणी जगले.
         श्रींच्या सातव्या वर्षीच ( गर्भाष्टमे ) मौंजीबंधन झाले. त्यांचे वडील श्रींची सोडमुंज होईपर्यंत दत्तूस (श्रींना ) कडेवर घेऊन माधुकरीस नेत असत.
         श्रींचा आवाज लहानपणी अत्यंत मधुर होता आणि संगीताचीही जाण होती.त्यामुळे त्यांचे वडील हनुमान जयंतीस कीर्तन करीत,तेव्हा साधारण दहा वर्षांचे असतानाच ते टाळ घेऊन वडीलांची साथ करीत. त्याचप्रमाणे काही काळ मेळ्यातही पदे म्हणत असत.
●● प्रतिज्ञाभंगाचे घोर प्रायश्चित्त ●●
        सन 1906-1907 चा काळ असेल.त्यावेळी देशात सर्वत्रच स्वदेशप्रेम  जागृत झाले होते. लोकमान्य टिळक हे त्यावेळच्या तरूणांचे बालांचे आदर्श पुढारी होते. विलायती मालावर बहिष्कार घालणे इत्यादी सारखे कार्यक्रम गावोगावी चैतन्याची लाट उसळवीत होते. त्यावेळी श्रींचे वय केवळ 12-13 वर्षांचे होते,पण अत्यंत संवेदनाक्षम असल्याने या चैतन्यशाली घटनांचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला होता. त्यांनी मनाशी विलायती साखर खाण्याची प्रतिज्ञा केली होती. पण घरात मात्र कुणालाही या गोष्टीची कल्पना नव्हती.
             एकदा असे झाले की वडीलांच्या आज्ञेवरून साखरेचा गोड पदार्थ मनाविरुद्ध खावा लागला होता.त्यावेळी बालवय असुनही,आपल्या हातून प्रतिज्ञाभंग झाला ही गोष्ट श्रींच्या  मनास इतकी लागून राहिली की, आत्मशिक्षा म्हणून शालेय प्रयोग शाळेतील अर्ध्या पोफळा एवढासोमलत्यांनी खाल्ला. परिणामी 107.5 अंश ताप चढून तीन दिवस बेशुध्द होते . हरिकृपेने आणि त्यांच्या हातून पुढे एवढे महत्कार्य व्हावयाचे होते म्हणूनच की काय , त्यावेळी हे प्राणसंकट टळले. परंतु घडलेल्या या प्रसंगावरुन बालवयातही आपली प्रतिज्ञा, आपला निश्चय आपण प्राणपणाने पाळलाच पाहिजे या विषयींची जागरुकता स्पष्ट दिसून येते.
             1908 साली श्रींचे वडील सेवानिवृत्त झाले. वडिलांना त्यावेळी दरमहा फक्त  पंधरा रुपये पेन्शन मिळत असे. यावर्षीच वयाच्या 15 व्या वर्षी श्री मराठी सातवी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले. यानंतरचे त्यांचे माध्यमिक शिक्षण मुरूड-जंजिरा येथे होऊन ऑक्टोबर 1913 मध्ये ते मॅट्रीक पास झाले.

            सन 1914 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी बडोद्यास त्यांचे मामा श्री.पेंडसे हे प्राध्यापक होते.त्यांच्याकडे ते पुढील शिक्षणासाठी म्हणून गेले. ‘ बडोदा काॅलेजमधून सन 1918 मध्ये ते संस्कृत हा मुख्य विषय घेऊन बी.. झाले. त्यावेळी थोर देशभक्त श्री.शंकरराव देव थोर समाजसेवक श्री देवधर हे त्यांचे सहाध्यायी होते.

लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

  1. प्रतिज्ञाभंगाचे प्रायश्चित्त बोधप्रद !

    ReplyDelete
  2. प्रतिज्ञाभंगाचे प्रायश्चित्त बोधप्रद !

    ReplyDelete
  3. Pdf file tayar karun link send kara plz kiva play store vr book tayar kara.
    Khup chan ahe.

    ReplyDelete
  4. श्रीमंती शामाताई दिवाकर यांचेशी मी बोलणे केले आहे की मला मानवतां पूर्ती साधन अर्थात संध्योपासना या पूसतकाचया काही प्रती विकत घ्यावयाचया आहेत, छपाई सुरू आहे असे त्यांनी सांगितले त्यास बरेच दिवस झाले आहेत, जरा आपणही लक्ष घालावे ही विनंती.

    ReplyDelete
  5. मानस गुढार्थ चंद्रिका ग्रंथ हवा आहे कोठे मिळेल ?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी