प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १३

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १३

हरीभट शिष्यभावाने आला



१९४५ साल होते.मार्च महिना सुरु झाला होता. उन्हाळ्याची सुरुवात होती. एक दिवस एक कानडी आप्पा श्रींच्या परिचित अशा एका सज्जनाची चिट्ठी घेऊन चासला येऊन ठेपला. जवळ लोट,भांडे,सोवळे,पांघरूण वैगेरे काहीच नाही. श्रींच्या पुढे येऊन प्रणाम करून ‘हरीभट' म्हणून नाव सांगितले. ‘कुठले राहणार?’ विचारता , सागर,जिल्हा शिमोगा म्हणून उत्तर दिले. वय केवळ १९ वर्षांचे !                                                                                                                                              परमार्थाची आवड म्हणजे एक आश्चर्यच होते ! त्यास ता. २२/३/१९४५ रोजी मंत्रपूर्णाभिषेक दीक्षा श्रींनी दिली. चासला मठातच राहिला होता. श्रींच्या सतत सान्निध्यामुळे योगमार्गात त्याची भराभर प्रगती होऊ लागली. एप्रिलची ९ तारीख. श्रींचे समोरच हरिभट अभ्यासास बसे. त्या दिवशी त्याची निर्विकल्प समाधी लागली. शिष्याची प्रगती पाहून गुरूंना आनंद वाटला. त्यांनी त्याच्यावर अधिकच कृपावर्षाव केला. त्यानंतर आठ दिवसातच परत २-२।। तास तो निर्विकल्पात गेला होता.


      जून पर्यंत चासलाच होता. मराठी त्याला चांगले बोलता येऊ लागले होते. पण या वास्तव्यातच त्याची आचारहीनता,आलस्य , सिद्धीची लालसा , जिव्हालौल्य इत्यादी दुर्गुण श्रींच्या नजरेस आले. मुमुक्षुत्व जरासेही नव्हते. वागण्यात शिस्त नव्हती. आळस पुरेपूर होता. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे दुर्जनांची संगत त्यास फार प्रिय असे. हे सर्व पाहिल्यावर श्रींनी त्यास पैसा न घेण्याची व ज्योतिष सामुद्रिक पाहिल्यास ब्रम्हहत्येच्या पातकाची शपथ घ्यावयास लावली व शुक्रवार २५ जून १९४५ या दिवशी पायी यात्रेसाठी म्हणून चासहून निरोप दिला.

लेखिका : श्रीमती कमलताई बा. वैद्य 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी