प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १०
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - १०
सन १९४० च्या जुलैपासूनच खेड , जि.पुणे येथे श्री केदारेश्वराच्या मागील मठात
निवास असतानाच आळे येथील श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे } स्वामी महाराज
यांच्याबद्दलची परस्परविरुद्ध अशी पुष्कळ माहिती श्रींना कळली होती. पैसे , दागदागिने
वगैरे मागतात,घेतात, संग्रह करतात, इत्यादी सर्व विक्षिप्त वृत्तीची हकीकत कळली
होती. पैसे घेणाऱ्या आणि संग्रह करणाऱ्या संन्याश्याचे मुखावलोकन करू नये, असे
पूर्वाश्रमात श्रींना वाटत असे. हे सर्व माहित असून दिवसेंदिवस अंतरातून श्रींना
अशी स्फूर्ती होऊ लागली कि, ते श्रोत्रिय ब्रम्हविद् वरिष्ठ आहेत व पूर्ण समाधान
होण्यास त्यांच्या चरणावर शिष्यभावाने डोके ठेवणे जरूर आहे. ही अंतरीची वृत्ती ,
स्फूर्ती { Inner Voice } बळावत गेली. व १८-१-१९४३ ला खेड येथे चतुर्थाश्रम स्वीकारल्यानंतर दंड ग्रहण
करण्यासाठी श्रींनी श्री. वासुदेवानंद सरस्वती { पोटे स्वामी } यांचेकडे जाण्याचे
ठरविले.
श्री. प.पू.आळ्याच्या
महाराजांशी परिचय असलेला माणूस श्रींच्या बरोबर होता. त्याने मोटारचे तिकीट काढून
दिले. पण मोटारीत एकच जागा रिकामी होती. त्यामुळे त्यास बरोबर घेता आले नाही. २/३
तासांनी मागल्या मोटारीने त्याचे यायचे ठरले. व
श्रींनी मात्र त्या मोटारीने अाळ्यास प्रयाण केले. तो धन्य दिवस माघ शुद्ध दशमी ,
रविवार शके १८६४ हा ! दुपारी १२।। च्या सुमारास आळे येथे आमच्या श्री परम
गुरूंच्या निवासस्थानी ते जाऊन पोहोचले. यथाविधी दर्शनार्थ माडीवर गेले. आळ्याच्या
श्री महाराजांचे ते प्रसन्ना मुख व ब्रम्हतेज पाहूनच श्रींना परमानंद झाला व
धन्यता वाटली. पण त्यावेळी महाराज भिक्षा ग्रहण करीत होते. त्यामुळे वंदन न करताच
श्री स्वस्थ उभे राहिले. पूर्वसूचना किंवा पत्र काहीच पाठवले नसून आळ्याच्या
श्रीमहाराजांनी श्रींना पूर्वाश्रमीच्या आडनावाने संबोधून संस्कृतमध्येच कुशल
वगैरे विचारले. वास्तविक महाराज कधी कोणाजवळ संस्कृत बोलताना आढळत नसत. पण
श्रींच्या बाबतीतच हे आश्चर्य घडले. एकमेकास जणू एकमेकाची खूण पटली.
योगपट्ट विधीचा सोहळा
श्री आळ्याच्या महाराजांचे भोजन झाल्यावर
यथाविधी वंदन केले. यावेळीच
यद्पादपंकजपरागपवित्रमौली
भूयो न पश्यति नरो जठरं
जनन्या ।
तं वासुदेवमजमीशमनंतबोधं
श्रीमद्गुरूं शरणदं शरणं
प्रपद्ये ।।
हा श्लोक म्हणून साष्टांग वंदन केले. या वेळी या गुरुशिष्यांच्या हृदयात
अनिर्वाच्य सुखाचे जे कल्लोळ उसळले असतील त्याचे वर्णन कोण करू शकेल? यानंतर त्याच
दिवशी सायंकाळपर्यंत योगपट्ट विधीही उरकला. या प्रसंगाचे वर्णन श्रींनी पुढीलप्रमाणे
करून ठेवले आहे.
माघ शुद्ध दशमी मृग भानुवार ।
केला अंगीकार वासुदेवे ।।
केला अंगीकार वासुदेवे ।।
{ सन १९४३, आळे मुक्काम ,
ता. जुन्नर जि.पुणे }
योगपट्टदीक्षा देऊनी दासाशी ।
गुरुपरंपरा सांगितली ।।
गुरुपरंपरा सांगितली ।।
वासुदेवानंद,त्रीविक्रमानंद ।
नृसिंहानंद , वासुदेवानंद ।।
नृसिंहानंद , वासुदेवानंद ।।
यतीसांप्रदाय सरस्वती नामे ।
प्रज्ञानानंद अभिधान ।।
प्रज्ञानानंद अभिधान ।।
दुधाहारी मठ,भोसल्यांचा घाट ।
वाराणसी क्षेत्र पुण्यभूमी ।।
वाराणसी क्षेत्र पुण्यभूमी ।।
महावाक्य पंचीकरण तत्वबोध ।
करुनिया गुज निरोपिले ।।
करुनिया गुज निरोपिले ।।
शिरी पद्महस्त ठेउनिया मम ।
मज आप्तकाम गुरूने केले ।।
मज आप्तकाम गुरूने केले ।।
तेंव्हा कृतकृत्य झालो याची
देही ।
ठेउनिया शीर गुरुपायी ।।
ठेउनिया शीर गुरुपायी ।।
अजन्म्याचा आता जन्मची
चुकला ।
सनातना प्राप्ती अमरत्व ।।
सनातना प्राप्ती अमरत्व ।।
जगामाजी आता माझा मी भरलो ।
मजमाजी सर्व जग तैसे ।।
मजमाजी सर्व जग तैसे ।।
मजहूनी आता जग भिन्न नसे ।
जे जे दिसे भासे गुरुरूप ।।
जे जे दिसे भासे गुरुरूप ।।
{ माघ शुद्ध दशमी शके १८६४
}
लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य
लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य
|| जय जय रघुवीर समर्थ ||
स्वामीजींनी लिहिलेल्या मानवतापूरती साधन अर्थात संध्येापासना या संधयाविधीवरील पुस्तकातून मला मिळालेल्या मार्गदर्शनामूळे माझ्या जीवनात आमुलाग्र क्रांती घडून आली.
ReplyDeleteउत्तम आहे की विकासजी. स्वामीजींच्या प्रचार-प्रसारार्थ चाललेल्या या कार्यात आपल्याकडूनही सहकार्याची आशा करतो.
Deleteउत्तम आहे की विकासजी. स्वामीजींच्या प्रचार-प्रसारार्थ चाललेल्या या कार्यात आपल्याकडूनही सहकार्याची आशा करतो.
Delete'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।' हे तत्त्व पूर्णतः बाणल्यामुळे किंवा 'आधी केले मग सांगितले।' हे तत्त्व आचरल्यामुळे स्वामींसारख्या सत्पुरूषांची ग्रंथसंपदा म्हणजे केवळ अर्थपूर्ण शब्दांची कसरत नसून अनेकानेक सामान्यजनांच्या जीवनास योग्य असे दिग्दर्शन करून असामान्यत्वास प्राप्त करून देणारी ठरते.
ReplyDeleteजय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम.
'क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे।' हे तत्त्व पूर्णतः बाणल्यामुळे किंवा 'आधी केले मग सांगितले।' हे तत्त्व आचरल्यामुळे स्वामींसारख्या सत्पुरूषांची ग्रंथसंपदा म्हणजे केवळ अर्थपूर्ण शब्दांची कसरत नसून अनेकानेक सामान्यजनांच्या जीवनास योग्य असे दिग्दर्शन करून असामान्यत्वास प्राप्त करून देणारी ठरते.
ReplyDeleteजय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम जय राम जय जय राम.
I have sold and also freely distributed the Marathi book written by Swami ji on Sandhyopasana, my purpose is to awaken the today’s Brahmin youngsters to start the Vidhi of sandhyopasana and by that way boost the spark and spirit of Gayatri mantra into the minds of youngsters. Brahmin community people and youngsters today are wandering in the barren forest and darkness of nothingness surrounded by a hatred of non Brahmin people. If the sparks and spirit of Gayatri mantra is lit into their minds they will surely be able to withstand all the situation successfully in their life and they could prove to be a useful, valuable asset to the society and attract the minds of non Brahmin people.
ReplyDeleteSurely Vikasji. We have the role models. We have the prosperous history and chain of Guru-shishya parampara originated from the great Rishi-Munis at the time of Veda-Upanishada and maintained till today. Only the thing is to divert the distracted minds of the Indians and focus them on the path walked by Rishi-Munis which will be achieved by putting the life-story of them in front of today's generation, which is the only purpose of this blog.
DeleteSurely Vikasji. We have the role models. We have the prosperous history and chain of Guru-shishya parampara originated from the great Rishi-Munis at the time of Veda-Upanishada and maintained till today. Only the thing is to divert the distracted minds of the Indians and focus them on the path walked by Rishi-Munis which will be achieved by putting the life-story of them in front of today's generation, which is the only purpose of this blog.
Delete