प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १४

प. पू. श्री
 प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - 
भाग १४

...........गुरुद्रोही म्हणून मेला



        यानंतर श्रींच्या असे दृष्टीस आले की, तो तीर्थयात्रेस न जाता जुन्नर येथेच राहिला असून आपणास शरण येण्यापूर्वीच जारण- मारणादि शिकला होता. तेव्हा मार्गशीर्षात त्यास जुन्नर येथे परत बजावले की, जुन्नर सोडून पूर्वसंकल्पाप्रमाणे तीर्थयात्रेस जा, नाहीतर येथे कल्याण दिसत नाही ! पण सर्व प्रकारे अनाचारी असल्याने त्याने प्रत्यक्ष सद्गुरुवरच मारणाचा प्रयोग केला.
       त्यावेळी चास-कमानलाच श्रींचा मुक्काम होता. एकाएकी रक्ताचे जुलाब होऊ लागले व प्रकृती गंभीर झाली. त्यावेळी श्रींनी मुठभर तुळशीचा पाला वाटला व त्याचा रस फक्त सेवन केला व काही मंत्रोच्चार केला. इतकी अवस्था होती तरी नित्य नियमात खंड पडत नव्हता. पण शेवटी झाले असे की, प्रत्यक्ष ब्रम्हनिष्ठ अशा गुरुवरच केलेला मारणाचा प्रयोग त्या हरीभट्टावरच उलटला. व तो फाल्गुन वद्य ११ ला मढ , तालुका जुन्नर येथे मरण पावला !! त्याची क्रियाही कोणी केली नाही ! श्रींनी हे सर्व ऐकल्यावर “ अस्तु ! भगवदिच्छा !!” असे उद्गार काढले.
       या सर्व हकीकतीवरून खरोखरच साधकांनी धडा घेण्यासारखा आहे. कारण एकीकडे योगमार्गात प्रगती होऊन प्रत्यक्ष निर्विकल्पापर्यंत पोहोचलेल्या साधकाची ही स्थिति !! ज्यांच्यामुळे आपणास हा लाभ झाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता तर राहोच, पण त्यांनी केलेला हितोपदेशही त्यास रुचला नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्यावरच मारणाचा प्रयोग करण्यापर्यंत ज्याची मानसिक अधोगती झाली, त्यास यापेक्षा कुठली गती मिळणार ? म्हणजे योगमार्गातील दिव्यानुभवापेक्षा आपली मानसिक उन्नती वा अवनती यास किती महत्व आहे हे लक्षात येईल.


लेखिका :- श्रीमती कमलताई बा.वैद्य

|| जय जय रघुवीर समर्थ ||

Comments

Popular posts from this blog

प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र -भाग १

प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी