आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांसाठी काय करू शकतो?
🍂🍁आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींसाठी काय करू शकतो? 🍂🍁
🌸श्रीस्नामींनी सांगितल्याप्रमाणे आचार-विचाराचे होईल तेवढे जास्तीत जास्त पालन करणे.
🌸नाम घेणे व नामच हे साधन तसेच साध्य मानून नामातच राहणे.
🌸प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी कृत मराठी तुलसीरामायणाचे तसेच गोस्वामी तुलसीदास रचित मूळ श्रीरामचरितमानसाचे वाचन, मनन, चिंतन करणे.
🌸श्रीस्वामींच्या साहित्याचा शक्य तेवढा अधिकाधिक अभ्यास करणे.
🌸श्रीस्वामींच्या समाधीचे दर्शन घेणे. ( सहज परंडा, धाराशिव-उस्मानाबाद या भागात गेल्यावर, किंवा फाल्गुन वद्य दशमीला श्रींचे पुण्यतिथी उत्सवाचे वेळी, गुरुपौर्णिमा, रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती, इ. विशेष प्रसंगी)
🌸श्रीस्वामींच्या समाधीमंदिरातील व्यवस्थेसाठी तन-मन-धनाने हातभार लावणे.
🌸श्रीस्वामींचे चरित्र (whats app वरील २४ भागांचे) जास्तीतजास्त व्यक्तींपर्यंत पोहचवणे.
🌸समारंभाच्या वेळी भेटवस्तू म्हणून श्रीस्वामीलिखित पुस्तके देणे.
🌸सहज भेटल्यावर देखील, समाजात चर्चा करतांना सहज श्रीस्वामींविषयी आपल्याला भावलेली माहिती इतरांना सांगणे व त्यांनाही या कार्यात सहभागी करवून घेणे.
🌸आपल्या परिचयातील रामायण-भागवत कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, प्रबोधनकार, व्याख्याते यांना श्रीस्वामींविषयी चरित्राचे पुस्तक / whtas app वरील चरित्र/ श्रीस्वामींचे विविध साहित्य, इ. रूपाने श्रीस्वामींच्या दिव्य व अलौकिक कार्यकर्तृत्वाची ओळख करवून देणे व त्यांनाही ही माहिती कथा-कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून पुढे प्रसारित करण्यासाठी विनंती करणे.
🌸आपण स्वतःच जर रामायण-भागवत कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असल्यास आपल्या कथा-कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत श्रीस्वामी व त्यांचे साहित्य पोहचविणे. ( रामायणकथाकार श्रीस्वामीकृत 'मानस गूढार्थ चंद्रिका' या ग्रंथालाच अधिकाधिक प्राधान्य देऊन त्यात सांगितल्याप्रमाणे कथा सांगू शकतात. कीर्तनकार-प्रवचनकार आख्यानरूपाने किंवा श्रीस्वामींच्या चरित्रातील बोधप्रद प्रसंग दृष्टांतरूपाने सांगू शकतात.)
🌸श्रीस्वामींचे अप्रकाशित वाङ्मय प्रकाशित करण्यासाठी व प्रकाशित वाङ्मय अधिकाधिक प्रसारित करण्यासाठी मदत करणे.
🌸श्रीस्वामींचे चरित्र व साहित्य विविध भाषेत भाषांतरित करून ते प्रकाशित करणे.
🌸आपल्या परिचयाच्या साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, विशेषांकातून श्रीस्वामींचे चरित्र व वाङ्मय प्रकाशित करणे.
🌸श्रीस्वामींचे चरित्र व वाङ्मय what's app, Facebook, Telegram, you tube, इ. Social media च्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणे.
🌸सहज शक्य असेल त्या मार्गाने श्रीस्वामींची सेवा करणे.
।।परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वतीस्वामी महाराज की जय।।
।। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज की जय।।
।। सद्गुरू श्री श्रीधरस्वामी महाराज की जय।।
।। सद्गुरू श्रीबाबागंगादास महाराज की जय।।
।। जय जय रघुवीर समर्थ।।
।। श्रीराम जय राम जय जय राम।।
मानस गुढार्थ चंद्रिका ग्रंथ हवा आहे कोठे मिळेल ?
ReplyDelete