प.पू.श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र – भाग १३
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग १३ हरीभट शिष्यभावाने आला १९४५ साल होते.मार्च महिना सुरु झाला होता. उन्हाळ्याची सुरुवात होती. एक दिवस एक कानडी आप्पा श्रींच्या परिचित अशा एका सज्जनाची चिट्ठी घेऊन चासला येऊन ठेपला. जवळ लोट,भांडे,सोवळे,पांघरूण वैगेरे काहीच नाही. श्रींच्या पुढे येऊन प्रणाम करून ‘हरीभट' म्हणून नाव सांगितले. ‘कुठले राहणार?’ विचारता , सागर,जिल्हा शिमोगा म्हणून उत्तर दिले. वय केवळ १९ वर्षांचे ! ...