Posts

आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांसाठी काय करू शकतो?

🍂🍁आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामींसाठी काय करू शकतो? 🍂🍁 🌸श्रीस्नामींनी सांगितल्याप्रमाणे आचार-विचाराचे होईल तेवढे जास्तीत जास्त पालन करणे.  🌸नाम घेणे व नामच हे साधन तसेच साध्य मानून नामातच राहणे.  🌸प. प. श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी कृत मराठी तुलसीरामायणाचे तसेच गोस्वामी तुलसीदास रचित मूळ श्रीरामचरितमानसाचे वाचन, मनन, चिंतन करणे.  🌸श्रीस्वामींच्या साहित्याचा शक्य तेवढा अधिकाधिक अभ्यास करणे.  🌸श्रीस्वामींच्या समाधीचे दर्शन घेणे. ( सहज परंडा, धाराशिव-उस्मानाबाद या भागात गेल्यावर, किंवा फाल्गुन वद्य दशमीला श्रींचे पुण्यतिथी उत्सवाचे वेळी, गुरुपौर्णिमा, रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती, इ. विशेष प्रसंगी)  🌸श्रीस्वामींच्या समाधीमंदिरातील व्यवस्थेसाठी तन-मन-धनाने हातभार लावणे.  🌸श्रीस्वामींचे चरित्र (whats app वरील २४ भागांचे) जास्तीतजास्त व्यक्तींपर्यंत पोहचवणे.  🌸समारंभाच्या वेळी भेटवस्तू म्हणून श्रीस्वामीलिखित पुस्तके देणे.  🌸सहज भेटल्यावर देखील, समाजात चर्चा करतांना सहज श्रीस्वामींविषयी आपल्याला भावलेली माहिती...

श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे संक्षिप्त चरित्र

 परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराजांचे संक्षिप्त चरित्र  परमहंस परिव्राजकाचार्य श्रीप्रज्ञानानंद सरस्वती स्वामी हे आपल्या प्राचीन सनातन वैदिक हिंदू संस्कृतीतील एक अद्भुत विभूतीमत्व एकोणिसाव्या शतकात होऊन गेले. यांनी संपूर्ण गोस्वामी तुलसीदास रचित 'श्रीरामचरितमानस' या रामायणग्रंथाचा समवृत्त-समछंद अनुवाद करून त्यावर विस्तृत टीका लिहिली. म्हणूनच श्रीस्वामी 'महाराष्ट्राचे तुलसीदास' या नावाने विख्यात आहेत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, काटेकोरपणे कर्ममार्गाचे आचरण आणि तितक्याच उच्चप्रतीची निष्ठावंत, निष्काम श्रीरामभक्ती आपल्याला श्रीस्वामींच्या जीवनात पहावयास मिळते. आपला प्रपंच नेटका करून परमार्थातील अत्युच्च शिखर कसे गाठावे याचा वस्तुपाठ म्हणजेच श्रीस्वामींचे चरित्र होय. पूर्ववृत्तांत     श्रीस्वामींचे पूर्वाश्रमीचे नाव श्री. दत्तात्रय नारायण कर्वे. मूळस्थान मुक्काम गिम्हवणे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. गार्ग्य गोत्र कोकणस्थी ब्राह्मण. श्रीहरिहेश्वर व श्रीजोगेश्वरी ही यांची कुलदैवते. श्री. नारायणराव म्हणजे श्रींचे वडील हे शिक्षक होते, ...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४ 🌹 शाळिग्राम हृदयावर सरकवून घेतला 🌹 नंतरचे दाेन दिवस बाेलणे फारसे नव्हते. स्नान वगैरे सुरूच हाेते, पण समाधी अवस्था असावी. नंतर १० व्या दिवशीही बोलणे बंद हाेते. सकाळ व संध्याकाळचे स्नान स्नानगृहात न हाेता तेथेच परातीत बसवून घातले गेले. सकाळपासून घाेंगडीवर ठेवण्यात आले हाेते. बाेलणे बंद असले तरी फारच वेदना वाढल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घाेष ते करीत असत. असाच सर्व दिवस गेला. रात्री एकच्या सुमारास डाॅ. कुलकर्णी ( त्यांच्या सेवेला रात्रभर हाेतेच. ) यांनी वेळ जवळ आल्याचे जाणले व पूर्वी श्रींनी सांगितल्याप्रमाणे शाळिग्राम त्यांच्या छातीवर ठेवला. वास्तविक श्रींचे हातपाय अगदी गार पडले हाेते. तशा अवस्थेतही श्रींनी आपल्या दाेन हातांनी ताे हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच त्यांना ( गंगाजळ व तुळशीपत्र ) तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा घाेष सुरू असतांनाच ( फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वा. १० मिनिटांनी ) खाडकन् डोळे उघडले गेले. ( एकदम वीज चमकल्यासारखे झाले ) आणि त्याचवेळी प्राण पंचतत्वांत विलीन झाले. अश...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २३

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २३             🌹 महासमाधी 🌹 वज्रादपि कठाेराणि मृदूनि कुसुमादपि । लाेकाेत्तराणां चेतांसि काे हि विज्ञातुमर्हसि ।। असे म्हणतात ना, ते अगदी खरे आहे. दुसर्‍याच्या दुःखाचा विचार मनात आला की, लाेकाेत्तर पुरूषांचे हृदय कुसुमाहून काेमल बनते. पण स्वसुखाविषयी स्वतःच्या, देहसाैख्याविषयी ते प्रसंगी वज्रापेक्षा कठाेर बनते. श्रींच्या संबंधीही असेच म्हणणे योग्य ठरेल.     १९६६ पासून श्रींच्या मनात प्रायोपवेशनाने देहत्याग करण्याचा विचार घाेळत होता. जसे जसे दिवस लाेटू लागले तसा हा विचार बळावतच गेला. परांडा येथेच फाल्गुन वद्यात प्रतिपदेपासून प्रायोपवेशन करून देह ठेवण्याचे ठरविले आहे तरी कुणालाही पाैर्णिमेपर्यंत दर्शनास यावयाचे असेल त्यांनी यावे, याप्रमाणे सर्व शिष्यमंडळींच्याकडे पत्रे रवाना झाली.     पू. श्री. गुळवणी महाराज व पू. श्री. श्रीधरस्वामी महाराज ह्यांनाही पत्राने हा निश्चय कळविला गेला. त्यांची, तसेच इतर अनेक विद्वान मंडळींची पत्रे आली की आपण हे उप...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २२

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २२        🌹 रामवनचा अद्वितीय सत्कार 🌹          सप्टेंबर १० पर्यंत १६ पारायणे पुरी झाली हाेती व शिवपुराण सांगणे संपून अभंग रामायणावर श्रींची प्रवचने सुरू हाेती. ६ - १० पर्यंत २५ पारायणे पुरी झाली. याच सुमारास रामवन ( मध्यप्रदेश, सतना ) येथे श्री प्रज्ञानानंद पेटिका स्थापन हाेऊन त्यात रामचरितमानस ( मराठी ) गूढार्थ चंद्रिका नमुना अंक, प्रस्तावना खंड, मानसमणितील श्रींचे सर्व छापील लेख व श्रींचा पत्रव्यवहार वगैरे पेटिकेत ठेवला गेला.    फाल्गुन अखेर १०० पारायणे पुरी करावयाचा श्रींचा विचार हाेता. म्हणून मार्गशीर्ष पाैर्णिमेपासून ( दत्तजयंती ) १५/१२/१९५९ पासून मानसाची द्विदिन पारायणे सुरू झाली. या सुमारास श्रींनी १९५३ साली जी हस्तलिखित पंचरंगी पाेथी लिहून मानस संघ रामवनला दिली हाेती, ती त्यांच्या जागेत काेणी व्यक्तीने चाेरल्याचे पत्र रामवनहून आले हाेते. श्री रघुनाथांनी कदाचित ही परीक्षा घेतली असेल की श्रींना वाईट वाटते की काय? पण एखादी वस्तू काेणास दिली की तिचे काय झाल...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र भाग - २१

Image
प. पू .श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २१ 🌹 मराठवाड्यातील वास्तव्य 🌹      १९५९ साली श्रींचा मुक्काम परंड्यास गेल्यानंतर समाधिकाळापर्यंतचे (१९६८ ) जास्तीत जास्त वास्तव्य मराठवाड्यांतच झाले. एकदाच नाशिक पंचवटी येथे जाणे झाले व त्यावेळी परत परंड्यास जाताना १९६१ साली थाेडे दिवस इस्लामपूरला जाणे झाले होते. तसेच १९६६ साली काही महिने सातारा, चिकुर्डे येथे निवास झाला. गंगाखेड, लाेहारा, उस्मानाबाद, परांडा वगैरे भागातच अधिक काळ निवास झाला.     ४ मार्च १९५९ ला श्री गंगाखेड येथे प्रथम आले. गंगाखेड येथील जहागिरदारांच्या श्रीकृष्ण मंदिरातील सभामंडपाच्या माडीवर स्वतंत्र खाेलीत श्रींचा निवास हाेता. मंदिर श्री गाेदेच्या काठी हाेते. चांगले सुंदर, एकांत, शांत व बंदाेबस्तात असलेले. वरच दिवा, कंदील, बादली, लाेटी व बादलीभर पाणी एवढी व्यवस्था हाेती. फक्त दाेन वेळ स्नानाला व एक वेळ भिक्षेसाठी खाली उतरावे लागे. लाेकांची उपाधी नसल्यासारखीच हाेती. षष्ठीपासून एकादशीपर्यंत मंदिरात मामुली उत्सव असे. त्यावेळी प्रवचने हाेत. नदीवर व भिक्षेस जाण्यास पायर्‍...

प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २०

Image
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २० 🌹 मानसमणि सहयोग 🌹          त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे १९५० पासूनच श्रींनी 'मानसमणि' या रामवन, सतना, मध्यप्रदेश येथून प्रसिद्ध होणाऱ्या, तुलसीरामायणावरील लेखांना प्राधान्य देणाऱ्या हिंदी मासिकाचे ग्राहकत्व स्वीकारले होते. १९५२ च्या नोव्हेंबर महिन्यात या 'मानसमणि'च्या अंकात 'मानस (काव्य) दोषारोपण विराकरण' हा श्रींचा लेख प्रसिद्ध झाला. तो वाचून इंटर पास होऊन पोस्टात नोकरी करणाऱ्या श्री धनसिंह भदौरिया नावाच्या (कानपूरजवळील परौख, पोस्ट नोचारी, जिल्हा कानपूर) तरुणाचा दर महिन्यास ६/७ शंका, समाधानासाठी श्रींच्याकडे येऊ लागल्या. व त्या टीकालेखनसमाप्तीपर्यंत नियमीतपणे येत होत्या. त्यामुळे सुमारे १५० शंकांचे समाधान श्रींना मानसाधारे करण्यास सापडले व टीकालेखनास फार मदत झाली. आश्चर्यकारक घटना ही की, टीकालेखनसमाप्ती व त्या भैय्या धनसिंह भदौरियाचे देहावसान समकालीच झाले. श्रींचे प्रत्यक्ष दर्शन त्यास अखेरपर्यंत झाले नव्हते. ही अनपेक्षित ईश्वरी योजना अगदी थक्क करणारीच आहे. हा पत्रव्यवहार चाल...