प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४
प. पू. श्री प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी चरित्र - भाग २४ 🌹 शाळिग्राम हृदयावर सरकवून घेतला 🌹 नंतरचे दाेन दिवस बाेलणे फारसे नव्हते. स्नान वगैरे सुरूच हाेते, पण समाधी अवस्था असावी. नंतर १० व्या दिवशीही बोलणे बंद हाेते. सकाळ व संध्याकाळचे स्नान स्नानगृहात न हाेता तेथेच परातीत बसवून घातले गेले. सकाळपासून घाेंगडीवर ठेवण्यात आले हाेते. बाेलणे बंद असले तरी फारच वेदना वाढल्यास 'श्रीराम, श्रीराम' असा उद्घाेष ते करीत असत. असाच सर्व दिवस गेला. रात्री एकच्या सुमारास डाॅ. कुलकर्णी ( त्यांच्या सेवेला रात्रभर हाेतेच. ) यांनी वेळ जवळ आल्याचे जाणले व पूर्वी श्रींनी सांगितल्याप्रमाणे शाळिग्राम त्यांच्या छातीवर ठेवला. वास्तविक श्रींचे हातपाय अगदी गार पडले हाेते. तशा अवस्थेतही श्रींनी आपल्या दाेन हातांनी ताे हृदयावर सरकवून घेतला. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच त्यांना ( गंगाजळ व तुळशीपत्र ) तीर्थ घातले गेले. यानंतर भजनाचा घाेष सुरू असतांनाच ( फाल्गुन वद्य दशमीला रात्री १ वा. १० मिनिटांनी ) खाडकन् डोळे उघडले गेले. ( एकदम वीज चमकल्यासारखे झाले ) आणि त्याचवेळी प्राण पंचतत्वांत विलीन झाले. अश...